मुंबई : राज्यात झालेल्या राजकीय गोंधळात आता राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते पद आणि शिवसेना ठाकरे गटातील विरोधी पक्षनेते पद धोक्यात आलं आहे. या दोन्ही पदावर आता काॅंग्रेसने दावा सांगितला असून आता राज्यातील फुटीप्रकरणानंतर काॅंग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…अब्दुल सत्तारांवर खटला चालणार, ‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल, एकनाथ शिंदेंची पंचाईत
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर आमच्यासोबत राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडून जाण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला विधान परिषदेच्या आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने ठाकरे गटाकडे असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद जाण्याची मोठी शक्यता आहे.
हेही वाचा…आदिती तटकरेंवर केलेल्या टिकेवर अजित पवार गटाकडून प्रथमच शिंदे गटावर टिका, राजकारण तापलं
दरम्यान, ठाकरे गटाच्या आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने विधान परिषदेतील सदस्य संख्या आता काॅंग्रेसच्या सदस्यसंख्यापेक्षा कमी झाली आहे. ज्यांचे सर्वात जास्त आमदार त्यांचा विरोधी पक्षनेते पद असा कायदा आहे. त्यानुसार दोन्ही विधीमंडळात आता काॅंग्रेस पक्षाचा विरोधी पक्षनेते पद असणार असा दावा विधान परिषदेतील काॅंग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी केला असून त्यासंदर्भात त्यांनी काॅंग्रेसच्या वरिष्ठांकडे तशी मागणी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…प्रामाणिक कार्यकर्त्याला अजितदादांकडून बळ, सुदर्शन जगदाळेंची सोशल मिडिया प्रदेशाध्यक्षपदी वर्णी
हेही वाचा…‘त्या’ आमदारांना वळवण्याचा शरद पवार गटाकडून प्रयत्न, थेट फोन करून संपर्क
हेही वाचा…“..त्यामुळे एकनाथ शिंदेंचा सदैव गुलाम म्हणून काम करत राहिन,” शिंदेंचा एक फोन अन् बच्चू कडूंनी निर्णय बदलला
हेही वाचा…“रात्रीचा प्रवास, मुक्काम करा, पण…,” लोकसभेच्या ‘त्या’ १६० भाजपचा मेगा प्लॅन तयार
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवार गटाला अर्थमंत्री अन् मंत्री पद नाही तर ‘या’ कारणामुळे रखडला मंत्रिमंडळाचा विस्तार