पुणे : महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व राजकीय उलथापालथ सध्या पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोठा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात शिवसेना – भाजप युती सरकारमध्ये सहभागी झाला. एका बाजूला पक्षाध्यक्ष शरद पवार तर दुसरीकडे अजितदादांच्या गटामध्ये पक्ष विभागला गेला आहे. यानंतर आता दोन्ही गटाकडून नव्याने पक्षबांधणी करण्यात येत आहे.
हेही वाचा…आदिती तटकरेंवर केलेल्या टिकेवर अजित पवार गटाकडून प्रथमच शिंदे गटावर टिका, राजकारण तापलं
सोशल मिडीयाच्या माध्यमातून भूमिका मांडण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रणनीती आखण्यात येत आहे. यामध्ये गेली अनेक वर्षांपासून पक्षात सक्रीय असणारे सुदर्शन जगदाळे यांची सोशल मीडिया प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांना दिल्लीतून दिलं टार्गेट, “लोकसभा निवडणुकीसाठी काहीही करा पण..”
सुदर्शन जगदाळे हे गेली अनेक वर्षापासून पक्षात सक्रीय असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका मांडण्याचे काम त्यांनी केलं आहे. “एक कोटी अजित पवार समर्थक” सारख्या फेसबुक ग्रुप्सच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचे लाखो कार्यकर्ते जोडले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जगदाळे यांची सोशल मीडिया प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…‘त्या’ आमदारांना वळवण्याचा शरद पवार गटाकडून प्रयत्न, थेट फोन करून संपर्क
हेही वाचा…“..त्यामुळे एकनाथ शिंदेंचा सदैव गुलाम म्हणून काम करत राहिन,” शिंदेंचा एक फोन अन् बच्चू कडूंनी निर्णय बदलला
हेही वाचा…“रात्रीचा प्रवास, मुक्काम करा, पण…,” लोकसभेच्या ‘त्या’ १६० भाजपचा मेगा प्लॅन तयार
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवार गटाला अर्थमंत्री अन् मंत्री पद नाही तर ‘या’ कारणामुळे रखडला मंत्रिमंडळाचा विस्तार
हेही वाचा…अब्दुल सत्तारांवर खटला चालणार, ‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल, एकनाथ शिंदेंची पंचाईत