मुंबई : राज्यातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंर राज्यात जल्लोष सुरु होत आहे. तर शिवसेनेकडून राणे यांच्या निवडणवर टीका करण्यात आली आहे. आज राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर यांनी मीडीयाशी बोलताना सांगितले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मला फोन आला. त्यांनी मला शुभेच्छा दिल्यात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन आला नाही, हे सांगताना उद्धव यांचे मन एवढे मोठे नाही, असा राणे यांनी टोला लगावला.
मनसे आमदार राजू पाटील हे ईडी कार्यालयात गेल्याने राज्यात राजकीय चर्चेला उधाण
राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या खोचक टीकेलाही नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का, असे विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, नाही. त्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांचे मन इतके मोठे नाही. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो, असा खोचक टोला लगावला. दरम्यान शरद पवार यांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली. त्यांनी चांगले काम कर, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भोसरी जमीन आर्थिक घोटाळा: जावयाच्या अटकेनंतर आता एकनाथ खडसेंना दणका, ईडीकडून चौकशीचे समन्स
मोदी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आज नारायण राणे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर नारायण राणे यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच झाडाझडती सुरू केली. राणे यांनी अधिका-यांचा क्लास घेतला. मला न सांगता तुम्हाला सुट्टी घेता येणार नाही, असे बजावले आहे. इथून पुढे मंत्र्याला न विचारता अधिका-यांनी सुट्ट्या घ्यायच्या नाहीत, असे स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांना पण हजेरी लावण्याची सक्ती केली आहे. दरम्यान, एमएसएमई अंतर्गत किती रोजगार दिला, याचीही माहिती त्यांनी घेतली. आत्मनिर्भर भारत अभियान कसं राबविलं आणि जीडीपीत एमएसएमईचा किती वाटा, याची माहिती राणे यांनी यावेळी घेतली.
Read Also :
- आजारी खडसेंची ईडीकडून चौकशी सुरु, दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणूका पुढे ढकला…ठाकरे सरकारकडून पुन्हा एकदा आयोगाला विनंती
- चर्चा होती राजीनाम्याची, मात्र लॉटरी लागली थेट राज्यमंत्रीपदाची! मोदींकडून ‘दाजींना’ मोठे गिफ्ट
- केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान, मुंडे भगीनींचे पंक छाटण्याचा प्रयत्न?
- मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या नारायण राणेंकडे कोणतं खातं?