रायगड : बारामतीत पवार विरूद्ध पवार असा लोकसभेचा सामाना निश्चित झाल्यानंतर आता रायगडमध्ये देखील तटकरे विरूद्ध तटकरे असा राजकीय सामाना होण्याच्या मार्गावर आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी शरद पवार गटाने मोठी खेळी खेळली आहे. सुनील तटकरे यांना मात देण्यासाठी शरद पवार गटाने तटकरेंच्या भावाला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीनंतरआता रायगडमध्ये देखील परिवारात संघर्ष बघायला मिळणार आहे.
हेही वाचा…राज्यात पुन्हा पुतण्याचा काकांना दे धक्का..! अजित पवारांचा पुतण्या शरद पवार गटात दाखल
आता लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर असतांना शरद पवारांनी सुनील तटकरे यांच्याविरोधात मोठा डाव टाकला आहे. सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांना पक्षात उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे. सुनील तटकरे यांचे बंधू तसेच माजी आमदार अनिल तटकरे यांनी काही दिवसापुर्वी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर अनिल तटकरे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
रायगड, आणि श्रीवर्धनमध्ये खासदार सुनील तटकरे यांना मात देण्यासाठी पवारांची ही खेळी असावी, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तटकरे कुटुंबीयांमध्ये २०१९ पासून मतभेद निर्माण झाले आहेत. तत्पुर्वी शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्यात तडजोड झाली होती. मात्र ती जास्त काळ टिकली नाही. अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधुत तटकरे यांना डावलून २०१९ मध्ये सुनील तटकरे यांनी आपली मुलगी आदिती तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले होते. तेव्हापासून तटकरे कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होता.
हेही वाचा…“जरांगे पाटील आमदारांना आईवरून शिवीगाळ करतात,” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल
त्यामुळेच आता बारामतीत पवार विरूद्ध पवार असा लोकसभेचा सामाना निश्चित असतांना रायगडमध्ये देखील कुटुंबात सामाना होणार असे चित्र यावरून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या खेळीची आता सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचापहिल्यांदाच सुप्रिम कोर्टाने भाजपलं खडसावलं, चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपचा पराभव
हेही वाचा…बाबाने कॉंग्रेसला राम राम ठोकला, कॉंग्रेसने सुपुत्राची केली उचलबांगडी, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचाराज्यातील सर्व ६ उमेदवार राज्यसभेवर, भाजपचे तीन तर कॉंग्रेस, शिवसेना, अन् राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी
हेही वाचा…“तर मी साडीचा पदर खोचून उभी आहे”, नवनीत राणांनी थेट जलील यांना दिलं आव्हान
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजप पुन्हा मलाच संधी देणार, भाजप खासदार ‘हिना गावित’ हॅट्रिक साधणार का ?