नवी दिल्ली : चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय रद्द ठरविण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने आप-कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवाराला विजयी ठरविले आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपला मोठा फटका बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला निवडणुक अधिकाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. निवडणुक अधिकारी अनिल मसिह यांनी छेडछाड केलेल्या व अवैध ठरविलेल्या ८ मतपत्रिकांमध्ये कुलदीपकुमार यांना मते मिळाली होती. हे सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिका व निवडणुक प्रक्रियेच्या चित्रीकरणाच्या पडताळणीत स्पष्ट झाले. त्यामुळे मसिह यांच्यावर खटला दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.
हेही वाचा…“जरांगे पाटील आमदारांना आईवरून शिवीगाळ करतात,” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल
चंदीगड महापौरच्या निवडणुकीत निवडणुक अधिकारी अनिल मसिह यांनी छेडछाड केल्याचा व्हिडीओ काही दिवसापासून समाज माध्यमांवर फिरत होता. यावरून विरोधकांनी भाजवर सडकून टिका केली. तर याप्रकरणी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता याठिकाणी भाजपला मोठा धक्का बसलाय. ८ मते अवैध ठरविल्यानंतदर भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषीत केले होते. भाजप उमेदवार मनोज सोनकर यांना १६ तर आप-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार यांना १२ मते मिळाली होती. आप- कॉंग्रेसचे संख्याबळ अधिक असतानाही असा निकाल दिल्याने न्यायालयात दाद मागितली होती.
हेही वाचा…“४२ वर्षापासूनचा लढा यशस्वी..!” कोर्टातही मराठा आरक्षण टिकणार, महेश लांडगे यांचा विश्वास
दरम्यान, महापौरच्या निवडणुकीनंतरही काही राजकीय घडामोडी घडल्या. मनोज सोनकर यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. तर आपच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या गैरप्रकरांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बाबाने कॉंग्रेसला राम राम ठोकला, कॉंग्रेसने सुपुत्राची केली उचलबांगडी, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचाराज्यातील सर्व ६ उमेदवार राज्यसभेवर, भाजपचे तीन तर कॉंग्रेस, शिवसेना, अन् राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी
हेही वाचा…“तर मी साडीचा पदर खोचून उभी आहे”, नवनीत राणांनी थेट जलील यांना दिलं आव्हान
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजप पुन्हा मलाच संधी देणार, भाजप खासदार ‘हिना गावित’ हॅट्रिक साधणार का ?
हेही वाचा…राज्यात पुन्हा पुतण्याचा काकांना दे धक्का..! अजित पवारांचा पुतण्या शरद पवार गटात दाखल