नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच आता अजित पवार गटाचा थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला आहे. तर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आत्मचरित्र लिहिन तेव्हा अनेक गोष्टी बाहेर पडतील, असा इशारा दिला आहे. त्यावर आता शरद पवार यांनी त्यावर प्रत्युत्तर देत पटेलांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा निकटवर्तीय असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा कोयता कुऱ्हाडीने खून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ
शरद पवारांची आज येवल्यात सभा होत आहे. त्याआधी त्यांनी नाशिक येथील पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी आपल्या कामाची सुरूवात भटक्या- विमुक्त चळवळीतून केली. उपराकार लक्ष्मण माने हे साताराच्या क्षेत्रात काम करतात. त्यांच्यासह सुप्रिया सुळेंही काम करू लागल्या. नंतर सुप्रिया सुळे यांनी पक्षात करावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. मग सुप्रिया सुळे राज्यसभेत गेल्या. दोन वर्षांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताने सुप्रिया सुळे विजयी झाल्या. आता सुप्रिया सुळे यांची खासदारकीची तिसरी टर्म आहे. असं शरद पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली त्यांच्या कर्माने, पण आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांचा टाहो भाजपच्या नावाने का?
सुप्रिया सुळेंच्या वाटचालीत सत्तेचं कोणतेही स्थान मिळालं नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेस केंद्रात सत्तेत आल्यावर सुर्यकांता पाटील आणि आगाथा संगमा यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. लोकसभेत पराभव झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर संधी दिली. दहा वर्ष प्रफुल्ल पटेल मंत्री होते. सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा खासदार आहेत. त्यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी कोणतीही अडचण नव्हती. पण, पक्षाने सुप्रिया सुळेंऐवजी सुर्यकांता पाटील, आगाथा संगमा आणि प्रफुल पटेल यांना संधी दिली. काही लोक मला नेहमी म्हणायचे, तुम्ही सुप्रिया सुळेंवर अन्याय केला आहे. असंही शरद पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णया वेग, नार्वेकरांची सेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांना आपण केंद्रात मंत्रिपद दिलं. तीन वेळा खासदार केले. त्यानंतरही त्यांनी बंडखोरी केली. परंतु बंडखोरी करणारे सर्व जण पराभुत होतील, असा दावा यांनी केला. आपण वास्तुस्थिती मांडण्यासाठी राज्याचा दौरा करत असल्याने त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“न टायर्ड हूं, न रिटायर्ड मैं तो फायर हूं”, शरद पवारांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…तुरूंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांना मंत्रिपद दिलं, अडचणीच्या काळात मदत केली, वाईट वाटतं.? शरद पवारांनी असं उत्तर दिलं की..
हेही वाचा…“अजित पवारांमुळे आमचा त्रिशुळ तयार झाला, आता विनाश अटळ,” फडणवीसांचा विरोधकांना इशारा
हेही वाचा…अजित पवारांकडून मोदींचं कौतुक, शिंदे-फडणवीस-अजित पवार एकाच मंचावर
हेही वाचा…““हवं तर राजकारण सोडून देतो, पण तुम्ही राष्ट्रवादीत परत या,” आव्हाडांची अजित पवारांना भावनिक साद”