जालना : अंतरवाली सराठीत झालेल्या दगडफेकीप्रकरणात ऋषिकेश बेद्रे याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर ऋषिकेश बेद्रे याचे शरद पवार आणि राजेश टोपे यांच्यासोबत असलेले फोटो व्हायरल झालेत. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलेत. मात्र यामागची काहाणी वेगळी आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ऋषीकेश बेद्रे शरद पवारांच्या भेटीला गेले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
हेही वाचा…मोठी बातमी..! मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर
अंतरवाली सराठीच्या घटनेनंतर शरद पवार आणि राजेश टोपे यांच्यासोबत फोटो व्हायरल झाले होते. त्यावर बोलतांना ऋषीकेश बेद्रे म्हणाले की, अंतरवाली सराटीच्या घटनेनंतर शरद पवारांना भेटण्यासाठी राजेश टोपे यांच्या कार्यालयात गेलो होतो. या घटनेची माहिती देण्यासाठी शरद पवारांना भेटण्यासाठी गेलो होतो. पवार साहेबांसोबतच काम केले आहे. त्यांचा कार्यकर्ता आहे. तसेच मनोज जरांगे पाटलांच्यासोबत चांगले संबंध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“लोकसभेतील ४६ खासदारांवर निलंबणाची कारवाई,” सुप्रिया सुळे म्हणाल्या..
दरम्यान, अंतरवाली सराठीत जी घटना झाली. त्याबद्दल मला काही काही माहिती नाही. दगडफेकीत आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये माझा काहीही संबंध नाही. समाजासाठी आतापर्यंत काम केलं आहे. मरेपर्यंत समाजासाठी काम करणार. त्यासाठी कितीही दिवस तुरूंगात राहावं लागलं तरी चालेल. अशी प्रतिक्रिया बेद्रेनी दिलीय. अंतरवाली सराठीत झालेल्या प्रकरणामध्ये ऋषिकेश बेद्रे प्रमुख आरोपी असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसोबत सरकारची रणनीती ठरली ?
हेही वाचा…“‘त्या’ व्हिडीओत बडी भाभी म्हणजे तुम्हीच का ?” सलीम कुत्ता प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी देवयानी फरांदेंना डिवचलं
हेही वाचा…“तर या देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही”, ९२ खासदारांच्या निलंबणाच्या कारवाईवर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
हेही वाचा…“संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, ९२ खासदार निलंबित, राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदारांचाही समावेश”
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी ४४ हजार कोटीचं पॅकेज जाहीर