मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी. अशी आग्रही मागणी देश तसेच संपुर्ण महाराष्ट्रातून आल्यानंतर मी पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी घेत असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. मागील काही दिवसापूर्वी अध्यक्षपद सोडत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी अध्यक्ष पदाची जबाबदारी घेत असल्याचं पत्रकार परिषद म्हटलं आहे. त्यावर आता संपुर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण झाला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांचा ‘पावर गेम’, त्यामुळेच त्यांनी हा मोठा मास्टरस्टोक दिलाय”
शरद पवार यांनी आपला अध्यक्ष पदाचा निर्णय मागे घेतल्यानंतर जयंत पाटलांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आदरणीय शरद पवारसाहेब यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद गावोगावी व प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा असे आवाहन मी करत आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट, एन्ड होत नाही, तोपर्यंत प्रतिक्रिया नाही”, देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेतल्यानंतर जनमानसात तीव्र भावना उमटली. माझ्या निर्णयाचा फेरविचार व्हावा. यासाठी राज्यातील माझे हितचिंतक आणि माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे असंख्य कार्यकर्ते, चाहते संघटित होऊन मला अध्यक्षपदी कायम राहावे, असं त्यांनी आवाहन केलं. तसेच देश, महाराष्ट्रातून राष्ट्रवादी पक्षासाठी अध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा मी घ्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! पडद्यामागचं राजकारण, रश्मी ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला, एकच खळबळ
शरद पवार पुढे म्हणाले की, लोक माझे सांगाती हेच माझ्या सामाजिक जीवनामचे गमक आहे. लोकांचं प्रेम आणि विश्वासामुळे भारावून गेलाय. या सर्वांचा विचार करून मी अध्यक्ष पदी राहावे , या माझ्या विचाराचा निर्णय मी मागे घेत आहे. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीचा पुढचा उत्ताराधिकारी कोण? यावर बोलतांना ते म्हणाले की, भविष्यात राष्ट्रवादीचा उत्ताराधिकारी निर्माण होईल, हे सध्या आवश्यक होते. पक्षात संघटन, नवीन नेतृत्व निर्माण करणे, हे माझ्यासाठी महत्वाचे होते. तसेच पक्ष वाढीसाठी अधिका जोमाने काम करेन. असंही त्यांनी म्हटलं आहे.
आदरणीय शरद पवारसाहेब यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद गावोगावी व प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा असे आवाहन मी करत आहे. @NCPspeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“कुणाला जायचं असेल तर त्यांना मी..” , अजित पवारांच्या प्रश्नांवर शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“अखेर शरद पवाराच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम, पवारांची मोठी घोषणा”
हेही वाचा…रश्मी ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया.. म्हणाले की, “आमची भेट..”
हेही वाचा…“ते पुन्हा आले खरं, पण…”,म्हणून नाना पटोलेंनी फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…“नुसते फफारे, बिनकामाचे फडतुस लोक तुम्ही”, रूपाली पाटलांचा भातखळकरांनावर पलटवार