मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवार यांनी अचानकपणे दिल्याने राज्यात खळबळ माजली आहे. त्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यावरून आता देशातून तसेच राज्यभरातून राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी आपली प्रतिक्रिया देतांना मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“समितीने राजीनामा फेटाळ्यानंतर फटाके, मिठाई वाटत कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष”, शरद पवारांच्या भुमिकेकडे लक्ष ?
संजय शिरसाठ म्हणाले की, शरद पवार यांचा हा पावर गेम आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत कलह होता, त्यामुळे शरद पवार यांनी हा मास्टरस्टोक दिला आहे. आता राष्ट्रवादीला नाविलाजास्तव एकत्र यावं लागणार आहे. शरद पवार यांनी हे स्पष्ट केलं आहे की, माझी ताकत म्हणजे माझी ताकत आहे. शरद पवार काहीही उलथापालथ करू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
हेही वाचा…“राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही”, राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने राजकारणात काहुल माजलं
संजय शिरसाठ पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी जर निर्णय घेतला तर कुणालाही अडचण होऊ शकते हे शरद पवार यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. अजित पवार यांच्या चलबिचलपनाला ब्रेक बसला आहे. आता शांत बसणे हा एकमेव पर्याय आहे, राष्ट्रवादीतली चलबिचल आता शांत होईल. अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यांना महाराष्ट्राची धुरा स्वत: कडे घ्यायची आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट, एन्ड होत नाही, तोपर्यंत प्रतिक्रिया नाही”, देवेंद्र फडणवीस
हेही वाचा…मोठी बातमी..! पडद्यामागचं राजकारण, रश्मी ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला, एकच खळबळ
हेही वाचा…“मला विचार करण्यासाठी वेळ हवाय”, निवड समितीच्या प्रस्तावावर पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…Pune Loksabha: गिरीश बापट यांच्या जागी कोण? पुणे लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात महत्त्वाची अपडेट
हेही वाचा…“देशाला, राज्याला, पक्षाला शरद पवार साहेबांची गरज “