पुणे : पुणे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं अलिकडेच निधन झालं. त्यानंतर पुणे लोकसभा जागेसाठी लवकरच पोटनिवडणुक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गिरीश बापट यांच्यानंतर पुणे लोकसभा मतदार संघासाठी कुणाला उमेदवारी देण्यात येईल. याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. यातच आता प्रशासनाकडून देखील पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अॅक्शन प्लॅन तयार, पुढचा अध्यक्ष ठरला, बैठकीत दोन प्रस्ताव ?”
पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांची मोठी यादी आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, स्वरदा बापट हे इच्छुक उमेदवार आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली जात आहे.
हेही वाचा…अजित पवारांना धक्का : हवेली बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘सुपडा साप’
यामध्ये आता प्रशासनाकडून देखील हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्र सुस्थितीमध्ये आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.
हेही वाचा…‘आता लोकांची खात्री पटली, राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवली’
जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची पाहणी; तसेच ‘ईव्हीएम’ मशिनची तपासणी करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“देशाला, राज्याला, पक्षाला शरद पवार साहेबांची गरज “
हेही वाचा…“समितीने राजीनामा फेटाळ्यानंतर फटाके, मिठाई वाटत कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष”, शरद पवारांच्या भुमिकेकडे लक्ष ?
हेही वाचा…“राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही”, राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने राजकारणात काहुल माजलं
हेही वाचा…Breaking: शरद पवारांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस समितीचा महत्त्वाचा निर्णय! कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
हेही वाचा…“मी पुन्हा येईन, तो कसा येतो, ते तुम्हाला….”, तापलेल्या राजकारणात फडणवीसांचं सुचक विधान