मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात एकच चर्चा रंगली आहे. यातच आता देशभरातून शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे.
हेही वाचा…“देशाला, राज्याला, पक्षाला शरद पवार साहेबांची गरज “
अतुल भातखळकर यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांनी अध्यक्ष नसलेला पक्ष आणि पक्ष नसलेला अध्यक्ष असं खोचक टोला हाणत राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर नुसते फफारे, बिनकामाचे फडतुस लोक असं म्हणत रूपाली पाटील यांनी भातखळकर यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“समितीने राजीनामा फेटाळ्यानंतर फटाके, मिठाई वाटत कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष”, शरद पवारांच्या भुमिकेकडे लक्ष ?
भातखळकर यांच्या टिकेला रूपाली पाटलांनी प्रत्तुत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, हिटलरशाही, सत्तेचा माज करणाऱ्यांना काय कळणार अध्यक्ष, पक्ष. जनतेने प्रेमाने डोक्यावर घेतलेली लोक, नाही समजू शकत आपण. नुसते फफारे, बिनकामाचे फडतुस लोक तुम्ही. असं म्हणत रूपाली पाटलांनी अतुल भातखळकर यांचा जोरदार समाचार घेतला आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांचा ‘पावर गेम’, त्यामुळेच त्यांनी हा मोठा मास्टरस्टोक दिलाय”
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट, एन्ड होत नाही, तोपर्यंत प्रतिक्रिया नाही”, देवेंद्र फडणवीस
हेही वाचा…मोठी बातमी..! पडद्यामागचं राजकारण, रश्मी ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला, एकच खळबळ
हेही वाचा…“मला विचार करण्यासाठी वेळ हवाय”, निवड समितीच्या प्रस्तावावर पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…Pune Loksabha: गिरीश बापट यांच्या जागी कोण? पुणे लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात महत्त्वाची अपडेट