मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काही दिवसात लागणार आहे. त्याआधी राज्याच्या राजकारणात मोठी बातमी समोर आली आहे. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मला विचार करण्यासाठी वेळ हवाय”, निवड समितीच्या प्रस्तावावर पवारांची प्रतिक्रिया
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची २ मे रोजी पहाटे भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे. ही बातमी न्युज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा या वृत्त संस्थेने दिली आहे. यावरून आता आता राज्यात बदलाचे वारे वेगाने फिरत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का ? अशा चर्चा देखील रंगल्या आहेत.
हेही वाचा…Pune Loksabha: गिरीश बापट यांच्या जागी कोण? पुणे लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात महत्त्वाची अपडेट
त्यावर एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. रश्मी ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवाशी माझी भेट झाल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत, या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असून त्यात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही भेट झालेली नाही. असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटवरून म्हटलं आहे.
हेही वाचा…“देशाला, राज्याला, पक्षाला शरद पवार साहेबांची गरज “
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील निकाल येत्या पाच ते सहा दिवसात लागण्याची शक्यता आहे. या निकालानंतर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरले तर सरकार कोसळणार असून सत्ता राखण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी भाजपसोबत हातमिळवळी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने शरद पवारांनी देखील अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा रंगली आहे.
श्रीमती रश्मी ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवाशी माझी भेट झाल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत, या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असून त्यात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही भेट झालेली नाही.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“ते पुन्हा आले खरं, पण…”,म्हणून नाना पटोलेंनी फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…“नुसते फफारे, बिनकामाचे फडतुस लोक तुम्ही”, रूपाली पाटलांचा भातखळकरांनावर पलटवार
हेही वाचा…“शरद पवारांचा ‘पावर गेम’, त्यामुळेच त्यांनी हा मोठा मास्टरस्टोक दिलाय”
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट, एन्ड होत नाही, तोपर्यंत प्रतिक्रिया नाही”, देवेंद्र फडणवीस
हेही वाचा…मोठी बातमी..! पडद्यामागचं राजकारण, रश्मी ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला, एकच खळबळ