मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी. अशी आग्रही मागणी देश तसेच संपुर्ण महाराष्ट्रातून आल्यानंतर मी पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी घेत असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. मागील काही दिवसापूर्वी अध्यक्षपद सोडत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी अध्यक्ष पदाची जबाबदारी घेत असल्याचं पत्रकार परिषद म्हटलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! पडद्यामागचं राजकारण, रश्मी ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला, एकच खळबळ
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेतल्यानंतर जनमानसात तीव्र भावना उमटली. माझ्या निर्णयाचा फेरविचार व्हावा. यासाठी राज्यातील माझे हितचिंतक आणि माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे असंख्य कार्यकर्ते, चाहते संघटित होऊन मला अध्यक्षपदी कायम राहावे, असं त्यांनी आवाहन केलं. तसेच देश, महाराष्ट्रातून राष्ट्रवादी पक्षासाठी अध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा मी घ्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मला विचार करण्यासाठी वेळ हवाय”, निवड समितीच्या प्रस्तावावर पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार पुढे म्हणाले की, लोक माझे सांगाती हेच माझ्या सामाजिक जीवनामचे गमक आहे. लोकांचं प्रेम आणि विश्वासामुळे भारावून गेलाय. या सर्वांचा विचार करून मी अध्यक्ष पदी राहावे , या माझ्या विचाराचा निर्णय मी मागे घेत आहे. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीचा पुढचा उत्ताराधिकारी कोण? यावर बोलतांना ते म्हणाले की, भविष्यात राष्ट्रवादीचा उत्ताराधिकारी निर्माण होईल, हे सध्या आवश्यक होते. पक्षात संघटन, नवीन नेतृत्व निर्माण करणे, हे माझ्यासाठी महत्वाचे होते. तसेच पक्ष वाढीसाठी अधिका जोमाने काम करेन. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…Pune Loksabha: गिरीश बापट यांच्या जागी कोण? पुणे लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात महत्त्वाची अपडेट
दरम्यान, नवीन नेतृत्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पक्षात सर्व जण एकत्रित काम करत आहेत. त्यामुळे काही सहकाऱ्यांना संधी मिळावी, यासाठी मी पाठीमागे राहण्याचा विचार केला होता. परंतु कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन मी पुन्हा जबाबदारी घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर जे पंधरा ते वीस वर्षापासून पक्षासाठी काम करीत आहेत. म्हणजे जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांना राज्य पातळीवर संधी मिळावी. यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“देशाला, राज्याला, पक्षाला शरद पवार साहेबांची गरज “
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदच्या वेळी अजित पवार यांची गैरहजरी होती. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता. कुणाच्या अनुपस्थितीचा वेगळा अर्थ काढू नये, असं उत्तर अजित पवार यांनी म्हटलं. तसेच माझ्या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये काहीह फरक पडणार नाही. आम्ही एकत्र काम करू. असंही ते म्हणाले. त्याचबरोबर कुणाला जायचं असेल तर त्यांना मी थांबवू शकत नाही. असं उत्तर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांवर दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रश्मी ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया.. म्हणाले की, “आमची भेट..”
हेही वाचा…“ते पुन्हा आले खरं, पण…”,म्हणून नाना पटोलेंनी फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…“नुसते फफारे, बिनकामाचे फडतुस लोक तुम्ही”, रूपाली पाटलांचा भातखळकरांनावर पलटवार
हेही वाचा…“शरद पवारांचा ‘पावर गेम’, त्यामुळेच त्यांनी हा मोठा मास्टरस्टोक दिलाय”
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट, एन्ड होत नाही, तोपर्यंत प्रतिक्रिया नाही”, देवेंद्र फडणवीस