नवी दिल्ली : मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या कलानुसार झेडपीएमला सकाळी दहा वाजेपर्यंत बहुमत मिळालं आहे. झेडपीएम सध्या २२ जागांवर पुढे तर एमएनएफ १३ जागांची आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत काॅंग्रेस ४ तर भाजप फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. राज्यात विधानसभेच्या ४० जागा असून बहुमतासाठी २१ जागा जिंकायच्या आहेत.
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंच उमेदवार, उदय सामंताचं विधान, राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये वाढली धाकधूक
सकाळी आलेल्या कलानुसार सत्ताधारी एमएएफ ची सुट्टी होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तर विरोधी पक्ष झेडपीएम बहुमताच्या अगदी जवळ आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रन्ट ने आणखी एका टर्मचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र त्यावर विरोधी पक्ष झेडपीएम आता सत्ता स्थापन करतांना दिसत आहे.
हेही वाचा…“स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा”, आव्हाडांच्या ‘या’ टिकेला अजित पवार गटाचं उत्तर
दरम्यान, काल झालेल्या चार राज्यांच्या विधानसभेच्या निकालामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम दिसून आली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली आहे. तर राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता गमवल्यानंतर काॅंग्रेसला फक्त तेलंगणात सत्ता स्थापन करता आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली! भाजपा आमदार महेश लांडगे यांची संकल्पना
हेही वाचा…मोठी बातमी…! “एकाची गाडी फोडली आता दुसऱ्याच्या घरावर दगडफेक,”जालन्यात मोठा राडा, दोन माजी मंत्री टार्गेटवर
हेही वाचा…राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक, टोपेंनी ‘या’ माजी मंत्र्यांवर केलेत गंभीर आरोप
हेही वाचा…“बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का?”, जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सरकारला सवाल
हेही वाचा…“इडीने मुंबई अन् दिल्लीतलं घर का ताब्यात घेतलं? त्याचाही पुस्तकात उल्लेख करावा,” शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना टोला