पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, यामुळे आता काही ठिकाणी महाविकास आघाडीत असलेले अंतर्गत मतभेदही उघड होत आहेत. या पार्श्वभूमीवर, खेड पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत असतानाही पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे.
“…तर देशात लसीकरण शक्य नसतं आणि देश कायमच्या लॉकडाऊनमध्ये गेला असता” – फडणवीस
“ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झालात, त्या आमदारांना तरी समजून घ्या,” असा शाब्दिक टोला मुख्यमंत्र्यांना लगावला असून, “हा वाद स्थानिक पातळीवरचा असून, त्याचा राज्य सरकारवर काहीच फरक पडणार नाही. आम्हाला मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व मान्य आहे,” असं म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीला पंचायतीवर वर्चस्व निर्माण करण्यात, दिलीप मोहिते-पाटील यांनीच पडद्यामागून सूत्रे हलवल्याचे सांगितले जात आहे.
राणे-सेना वादानंतर राऊतांच्या सुरक्षेत वाढ, घर आणि कार्यालयाला छावणीचं स्वरूप!
दुसरीकडे, “खेडमध्ये आघाडीत बिघाडी होण्यामागे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील जबाबदार आहेत,” असा दावा त्यांनी केला आहे. “शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर सभापती झाल्यानंतर त्यांनी ६ महिन्यानंतर “राष्ट्रवादीचा सभापती होईल,” असं स्पष्ट केलं. मात्र ६ महिन्यानंतरही संधी मिळत नसल्याने, पोखरकर यांच्यावर अविश्वास ठराव आणला आणि याला वेगळं वळण देण्याचं काम आढळराव पाटील यांनी केलं, हे कारण मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे.
“…तर ५ सप्टेंबरला जलसमाधी घेऊ,” राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा; पंचगंगा परिक्रमा सुरू
तसेच, “संजय राऊत यांनी खेडमध्ये येऊन केलेलं वक्तव्य गैरसमजातून केलं होतं. त्यांना आढळराव पाटलांनी खोटी माहिती दिली. त्यामुळे त्यांनी माध्यमांत तसं विधान केलं. त्याआधी आघाडीचा घटक असल्याने त्यांनी मला बोलावून घ्यायला हवं होतं. पण शिवाजी आढळराव पाटील हे माजी खासदार झाले. माजी खासदारासाठी वाद होईल असं वाटत नाही. त्यामुळे त्यांचा शिवसेनेला फारसा फायदा आहे, असं मला असं वाटत नाही,” असा खोचक चिंताही त्यांनी आढळराव पाटील याना काढला आहे.
Read Also :
- मनसे अध्यक्षांनी घेतली सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट, दिली पहिली प्रतिक्रिया
- मविआ नेते राज्यपालांना भेटणार? १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटण्याची शक्यता!
- “थांबा, दिवाळीनंतर आमचेच सरकार राज्यात येईल” रोहित पवारांच्या मतदारसंघात सुजय विखेंना गुदगुल्या
- अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक, बंगल्याचं मोठं नुकसान, काय घडलं?…
- पीएमआरडीएच्या आराखड्याविरोधात माजी राज्यमंत्री संजय भेगडे मैदानात