मुंबई – १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने झटका दिला आहे. अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचाराची परवानगी मागितली होती. मात्र, पीएमएलए न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली आहे. खासगी रुग्णालयाऐवजी जे.जे. रुग्णालयात खांद्यावरील शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
“संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय, हा रोजचा तमाशा बंद करा”
ईडीने अनिल देशमुख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यास विरोध दर्शविला होता. देशमुख यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या निखळलेल्या खांद्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. जेजे रुग्णालयात अशी शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था आणि तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध आहेत, असा अहवाल ईडीने कोर्टात सादर केला होता. या अहवालाच्याआधारे ईडीने देशमुख यांच्या खासगी रुग्णालयातील उपचारांच्या विनंतीला तीव्र विरोध दर्शविला होता.या अहवालाची दखल घेत विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी विनंती फेटाळली.
मंत्रालयासमोरच कुटुंबीयांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सावधगिरीने मोठा अनर्थ टळला
जे.जे. रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे वाढते वय पाहता सरकारी रुग्णालयाऐवजी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देशमुखांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र ईडीनं याला विरोध केला होता. ईडीनं देशमुखांवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचं सांगणारा अहवाल कोर्टात सादर केला होता. तसेच खासगी ऐवजी जेजेतही ही शस्त्रक्रिया होऊ शकते, असाही ईडीनं दावा केला होता.
“उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर”; उद्धव ठाकरेंच्या तोंडी शरद पवारांची भाषा; भाजपाचा टोला
Read also:
- “औरंगजेबाच्या कबरावर फुलं वाहिली हे मी फक्त ठाकरे सरकारच्या काळात पाहिले”
- हिंदूजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?
- संजू आत्या गेल्या, अन् शेवटचा दुवाही निखळला; ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले; उद्धव ठाकरे
- रामदास कदमांची लवकरच नव्या जोशात शिवसेनेत दुसरी इनिंग सुरु होणार?
- मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या