पिंपरी चिंचवड : पिंपरी- चिंचवड शहाराला मावळातील पवना धरणातून बंद जलवाहिनीतून पाणी आणण्याच्या योजनेवरून राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार एकमेकांत भिडले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर या योजनेतील स्थगिती स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही त्यांना विश्वासात न घेता बारा वर्षानंतर राज्य सरकारने नुकतीच उठवली. असा आरोप करण्यात आलाय. त्यावर दोन्ही बाजूंनी आता टिका टिप्पणी होत आहे.
हेही वाचा…“कारण नसतांना मला ट्रोल केलं जातंय,” अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
पवना धरणातून बंद जलवाहिनीतून पाणी आणण्याच्या योजनेवरील स्थगिती उठवण्याकरिता स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यावर अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ती स्थगिती आता उठवण्यात आली आहे. असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावर अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी अजित पवारांनी स्थगिती उठवली असेल आणि हे सिद्ध केलं तर आमदारकीचा राजीनामा देईन, असं म्हटलं आहे. मात्र अजित गव्हाणे यांनी यावर वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…विलासराव देशमुख, चव्हाण, फडणवीस या मुख्यमंत्र्यांची परंपरा शिंदे मोडीत काढणार, तब्बल ३२ हजार रूपये…,
सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवारांनी या विषयाबाबत लगेच लक्ष घातलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या सभेत देखील अजित पवार यांनी या योजनेबाबत आढावा घेऊन राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानंतर हा निर्णय त्यांचा झाला आहे. त्यामुळे या निर्णयामध्ये अजित पवार यांचं फार मोठं योगदान आहे. यामध्ये अनेकांचं योगदान आहे, परंतु अजित पवारांच्या माध्यमातून हा प्रश्न मिटलेला आहे. असं अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे. तर पवना धरणाचा विषय घेतांना शेतकऱ्यांनाही विश्वासात घेतलं जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा…“घराणेशाहीतून भाजप झालीय भ्रष्टाचारी” भाजप मंत्र्यांच्या मुलीने लुटला १० कोटींचा निधी, राष्ट्रवादीची जोरदार टिका
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे माजी आमदार आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे अजित पवार विरूद्ध एकनाथ शिंदे समर्थक असा सामाना मावळमध्ये होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…गोकूळच्या सभेत मोठा राडा, महाडिक समर्थक आक्रमक, बॅरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न
हेही वाचा…प्रचंड खर्च..! “मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, 1500 रु. जेवणाची एक थाळी”
हेही वाचा…“अन्यथा दलालांचे खिसे भरणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही”
हेही वाचा…धक्कादायक….! ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या महिलेची मुलांसमोरच चाकूने भोसकून हत्या, एकच खळबळ
हेही वाचा…शीतल म्हात्रेंची किशोरी पेडणेकरांवर जोरदार टिका, म्हणाल्या की, “सटरफटर कचोरी ताईंच्या..,”