पुणे : मागील काही वर्षापासून पुणे शहर दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आलं आहे. यात कधी गाड्यांची तोडफोड तर कधी दोन गटातील राड्यासाठी तर कधी एकतर्फी प्रेमासाठी कोयता उगारला जात आहे. अशातच काल पुण्यातील वडगावशेरी परिसरात दोन गटात झालेल्या वादात एकाने कोयत्याने वार केलाय. याचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला असून या हल्ल्यात दोन ते तीन तरूण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. यावरून राष्ट्रवादीने सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
हेही वाचा…“देशात कुणी अशी धडक मारली नसेल तशी मुंबईत धडक मारा”, जरांगे पाटलांनी मुंबईत जाण्याचा सांगितला मार्ग
जुन्या भांडणाचा राग मनात ठेऊन काल पुण्यातील वडगावशेरी परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार केलेत. त्याठिकाणी विशेष करून पोलिस देखील उपस्थित होते. परंतु पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या हल्लात दोन ते तीन तरूण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हातात कोयता घेऊन या तरूणांनी शहरात काल रात्री उच्छाद माजवला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा…महायुतीतून कधी बाहेर पडणार ? बच्चू कडूंनी थेट स्पष्टच सांगितलं
दरम्यान, पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; डॉ. देवेंद्र फडणवीस गृह खात्यावर वचक ठेवण्यात अपयशी..! पुण्यासह आसपासच्या परिसरात गुंड प्रवृत्तीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून कायदा- सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. वडगाव शेरी परिसरात पोलिसांसमोरच या कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली. खरं म्हणजे परिसरात असे दहशतीचे वातावरण असताना त्या ठिकाणी पोलिसांचे गस्त वाढविणे आवश्यक आहे. मात्र फक्त एक महिला पोलीस त्या गुंडांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे; ही राज्याच्या गृह खात्यासाठी अत्यंत शरमेची बाब आहे. मुख्य रहदारीच्या रस्त्यांवरच समाजकंटकांकडून अशा प्रकारे सुरू असलेले दहशतीचे थैमान हे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. पुणे पोलीस प्रशासनासह राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन कोयता गँगच्या दहशतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीने सरकारकडे केली आहे.
पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; डॉ. देवेंद्र फडणवीस गृह खात्यावर वचक ठेवण्यात अपयशी..!
पुण्यासह आसपासच्या परिसरात गुंड प्रवृत्तीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून कायदा- सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. वडगाव शेरी परिसरात पोलिसांसमोरच या कोयता गँगची दहशत पाहायला…
— NCP (@NCPspeaks) December 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…काँग्रेस आज लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार, नागपुरात जाहीर सभा, ४५० जणांसाठी तीन भव्य व्यासपीठ
हेही वाचा...“काँग्रेस की रॅली है तय्यार है हम” ,लेकीन हम भी नही कुछ कम “, रामदास आठवलेंची खास कविता
हेही वाचा...“बच्चू कडू आघाडीत आले तर स्वागतच, शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट,” राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा.“अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणं एवढं सोप्प नाही”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा“काँग्रेसचं ‘है तयार हम’ अभियान नेमकं कशासाठी?” भाजपने काॅंग्रेसला विचारले ‘हे’ पाच प्रश्न