कोल्हापूर : उत्तरेचे विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने कोल्हापूर उत्तरेत पोटनिवडणूक होऊ घातली आहे. भाजपकडून सत्यजित कदम हे मैदानात उतरले आहेत तर पालकमंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची; राऊतांच्या वक्तव्याला राणांची मिश्कील टिप्पणी
शिवसेना सुरुवातीला नाराज होती असं वाटत होतं मात्र पक्ष प्रमुखांनी कोल्हापूरमधील नेत्यांना थेट मुंबईत बोलावून कानपिचक्या दिल्याने शिवसेनेचे नेते हे जयश्री जाधव यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी तब्ब्ल २३ उमेदवारी अर्ज भरण्यात आल्याने आता निवडणुकीची चुरस वाढलेली आहे. भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे. सध्या डोर टू डोर प्रचार करण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. काँग्रेसचा उमेदवार आण्यासाठी सर्वात जास्त ताकद शिवसेनेने लावली आहे हे मात्र विशेष.
पेनड्राईव्हची फॅक्टरी यांनी काढली आहे का? संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
आता प्रचाराचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे आणि यामध्ये कमालीची राजकीय धुळवड कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडुन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बंटी पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भव्य दिव्य सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची रंगत वाढली; निवडणुकीसाठी तब्ब्ल २७ अर्ज दाखल
दुसरीकडे भाजपनेही सत्यजित कदम यांना निवडून आण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. साम, दाम, दंड, भेद या उक्तीप्रमाणे भाजप मैदानात उतरला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्यजित कदम यांना निवडणून आण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे अशा भाजपमधील वजनदार नेत्यांच्या सभा घेण्याचे आयोजन भाजपकडून करण्यात आले आहे.
Read also:
- कंगना रणावत अन् गोस्वामींवर हक्कभंग आणल्यानंतर कारवाई; इडीच्या कारवाईनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया
- राणे कुटुंबियांवर कारवाई न केल्यास आत्महत्या करू; दिशा सलियनच्या आईचे राष्ट्रपतींना पत्र
- “वडिलांना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला”; सदाभाऊ खोतांनी मानले फडणवीसांचे आभार ;
- प्रताप सरनाईक यांना इडीचा दणका; कारवाई करत 11.36 कोटींची संपत्ती जप्त
- स्वाभिमान पक्षाचे एकमेव आमदाराची पक्षातून हाकलपट्टी; कार्यकर्त्यांचा ढोल वाजवत आनंद साजरा