मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. यामुळे आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नव्या आणि काही सोबत असलेल्या जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुकीच रणशिंग फुंकलं आहे. ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीसोबत असून त्यांना जवळपास २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. यातून काही जागा ठाकरे मित्र पक्षांना देणार आहेत. तर इतर काही जागांवर आपले तगडे उमेदवार मैदानात उतरविणार असल्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. यातच आता ठाकरे गटातील संभाव्य उमेदवारांची यादी समोर आलीय.
शिवसेना पक्ष फुटीनंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. यामुळे आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नव्या आणि काही सोबत असलेल्या जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुकीच रणशिंग फुंकलं आहे. मुंबईतील पाच लोकसभा मतदारसंघासह ठाणे, कल्याण, पालघर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, नाशिक, जळगाव, मावळ, शिर्डी, सांगली, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि यवतमाळ या जागांवर ठाकरे आपले उमेदवार उभे करणार आहे.
शिवसेना ठाकरे गटातील विद्यमान खासदार अरविंद सावंत. ठाणे मतदारसंघाचे राजन विचारे, उस्मानबाद मतदारसंघाचे ओमराज निंबाळकर, परभणी मतदारसंघाचे संजय जाधव आणि रत्नागिरी- सिंधुदूर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांना पुन्हा संधी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“याच्यासारखा नालायक माणूस नाही”, सख्या भावाने अजित पवारांना खडसावलं
दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर संजय दिना पाटील यांना भाजपच्या मिहीर कोटेजा मुंबई ईशान्य मतदारसंघातून लढणार आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर केलीय. तर याठिकाणी विनोद घोसाळकर यांचं नाव निश्चित झालं आहे.
छत्रपती संभाजीनगर मधून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचा सामाना एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यात होण्याची शक्यता आहे. तर बुलढाणा मतदारसंघातून नरेंद्र खेडकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला यवतमाळ-वाशिम मधून संजय देशमुख यांना भावना गवळी यांच्या विरोधात निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केलीय.
शिर्डी मतदारसंघातून ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यांची लढत शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याशी होईल. नाशिक मतदारसंघातून विजय करंजकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…लोकसभेसाठी शरद पवारांचे ‘१०’ शिलेदार ठरले ; भाजपसह अजित पवारांनाही देणार मोठी टक्कर
रायगडमधून शिवसेनेचा जुना चेहरा अनंत गिते यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांच्याविरोधात सामना आहे. हिंगोली मतदारसंघातून ठाकरे गटाकडून नागेश आष्टीकर यांचे नाव निश्चित केल्याची माहिती समोर आलीय. सध्या शिंदे गटाचे हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहे. सांगलीतून चंद्रहार पाटील यांचं नाव निश्चित झालंय. तर मावळ मतदारसंघातून संजोग वाघेरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून भाजपात बंड, असंख्य कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
“सख्खा भावाने अजित दादांना खडसावलं ; अजित पवार गटाकडून दिलं जोरदार प्रत्युत्तर”
हेही वाचा…सांगलीच्या जागेवरून ठाकरे अन् कॉंग्रेसमध्ये मोठी लढाई ; महाविकास आघाडीचे नेते आमनेसामने
हेही वाचा…जागा वाटपात ठाकरे मोठा भाऊ, २२-१६-१० लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला
हेही वाचा…माढ्यात महायुतीचे नेते आपल्याच उमेदवाराचा गेम करणार, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून महाजनाला पाचरण