मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष इंदरजित सिंह बाद आणि पनवेलचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, तसेच शिव वाहतूक सेनेचे शहाराध्यक्ष नितीन कसावे यांनी आज वर्षा निवासस्थानी जाऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत करत पक्षाचा झेंडा हाती दिला.
हेही वाचा…कोर्टाने अजित पवारांना फटकारलं, आव्हाडांनी डिवचलं, म्हणाले, काका का हे आता चांगलचं…
शैलेश जगनाडे आणि नितीन कसाबे या पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटात असताना रुग्णांना सेवा मिळावी यासाठी एक रुग्णवाहिका घेऊन ती त्यांना पक्षाला द्यायची होती, मात्र उबाठा गटाचे प्रमुख पनवेलमध्ये दौऱ्यासाठी आले असता या ॲम्बुलन्सचे लोकार्पण करावे एवढी कार्यकर्त्यांची साधी इच्छाही त्यांच्याकडून पूर्ण केली गेली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या या पदाधिकाऱ्यांनी या रुग्णवाहिकेसकट शिवसेनेत प्रवेश केला. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी या पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत करून वर्षा निवासस्थानी या रुग्णवाहिकेचे नारळ फोडून लोकार्पण करण्यात आले. तसेच निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या या दोन्ही कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच यांच्यासह मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक विजय जाधव, युवा समाजसेवक चेतन देशमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
हेही वाचा….शरद पवारांची नाशकात मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराला मैदानात उतरवणार
यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रा.मनीषा कायंदे, उपनेते विजय नहाटा, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, सुशांत शेलार, उपनेत्या सौ.कला शिंदे, विभागप्रमुख संध्या वढावकर, पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख ऍड.प्रथमेश सोमण, शहरप्रमुख प्रसाद सोनवणे उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा..“लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील,” एक देश एक निवडणुकीबाबत राष्ट्रपतीकडे अहवाल सादर, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…निवडणुकीपुर्वीच महायुतीत खळबळ, उमेदवारीसाठी महायुतीत ‘हा’ खासदार बंडाच्या तयारीत
हेही वाचा…कॉंग्रेसकडून भाजपचा भांडाफोड, राहुल गांधींचा ‘तो’ व्हिडीओ भाजपच्या अंगलट, चांगलचं सुनावलं
हेही वाचा..बारामतीप्रमाणेच ‘या’ ठिकाणीही होणार भावजय-विरूद्ध नणंद सामना, शरद पवारांनी घोषीत केला उमेदवार
हेही वाचा..वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पार पडणार पक्ष प्रवेश सोहळा ?