मुंबई : केंद्र सरकारने देशातील सर्वच राज्यांना जीएसटीचा परतावा म्हणून काही रक्कम पाठविली आहे. त्यात महाराष्ट्राला सर्वाधिक 14 कोटी रूपये मिळाले आहे. यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. तर भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी इंधनावरील कर कमी करावा असं सांगितलं आहे.
“गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
केंद्रातील मोदी सरकारने जीएसटी भरपाईपोटी महाराष्ट्राला १४ हजार कोटी इतकी रक्कम सुपूर्द केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आता तरी इंधनावरील कर कमी करावा ही अपेक्षा. असं चंद्रशेखर बावळकुळे यांनी म्हटलं आहे. तर केंद्र सरकारने परतावा केलेले जीएसटीचे पैसे हे पेट्रोल आणि डिझेल कर कपात कमी करण्यासाठी आलेले नाहीत. ते पैसे राज्याच्या विकास कामांसाठी आहेत, असं रोखठोक मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले आहे.
लोकसभेच्या मैदानात नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदे उतरणार?
केंद्र सरकारने पाठवलेले पैसे हे मागच्या काळात येणारे पैसे होते. हे सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे या पैशाचा आणि पेट्रोल डिझेल कर कपातीचा काहीच संबंध नाही. राज्यात अनेक समस्या आहेत. तसेच राज्याचा गाडा देखील व्यवस्थित चालला पाहिजे आणि अडचणीत सापडलेल्या प्रत्येक माणसाला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे मध्यंतरी आम्ही देखील पेट्रोल डिझेलवरील कर कपात केली आहे. असंही ते म्हणाले.
“जीएसटीचे पैसे पेट्रोल, डिझेल कर कपातीसाठी आले नाहीत”; अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं
दरम्यान, तसेच केंद्र सरकारने सर्वच राज्यांना जीएसटीचा परतावा दिला असून महाराष्ट्राला सर्वाधिक 14, 145 कोटी रूपये मिळाले आहेत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. तसेच महाविकास आघाडी सरकारने आता केंद्राकडे बोट दाखवायला नवे विषयय शोधावे, आणि पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून जनतेला लुबाणंही बंद करावं, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”
- “मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल”; करूणा शर्माच्या दाव्याने खळबळ
- “हिमालय संकटात होता, तेव्हा त्याच्या मदतीला ‘सह्याद्री’ धावून आला, तसेच काॅंग्रेसलाही..;” नाना पटोले
- “खैरे यांनीच आम्हाला भाजपकडून पैसे आणून दिले”; इम्तियाज जलील यांचा खैरेंना जोरदार टोला
- न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक आणि देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?