पुणे : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पुण्यात पीएफआय संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले. यावेळी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दोषींना इशारा दिला आहे.
PFI च्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा
पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच. पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत. असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
“गद्दारांना क्षमा नाही, तात्काळ माफी माग, नाहीतर..;” रूपाली पाटलांचा म्हात्रेंना सज्जड दम
भारत आणि महाराष्ट्रात कोणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असतील तर त्यांना आम्ही सोडणार नाही. ते लोक ज्याठिकाणी पाकिस्तानच्या घोषणा देत आहेत. त्यांना शोधून ज्याठिकाणी ते असतील त्याठिकाणांहून त्यांना उचलून अटक केली जाईल आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर होईल. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
“महाराष्ट्रावर संकट..! अन् शिंदे सरकार दिल्ली वारी एन्जॉय करताहेत”
PFI संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read also
- “तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार; शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही”?
- “आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीचं घड्याळ बंद पडणारच”
- राष्ट्रवादी, अन् आता भाजपच्या नेत्याचीही ठाकरेंना साथ; भाजप नगरसेविकेचा सेनेत प्रवेश
- “पाकिस्तानचे झिंदाबादचे नारे कुणी लावले तर ते सुखरूपपणे घरी जाणार नाहीत”; नितेश राणे
- “महाराष्ट्रात कुणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या तर त्यांना सोडणार नाही”; देवेंद्र फडणवीस