IMPIMP
After Pune, in Nashkath also in Mahayuti, salt stone; Ajit Pawar group dominates the district planning committee After Pune, in Nashkath also in Mahayuti, salt stone; Ajit Pawar group dominates the district planning committee

महायुतीत जागांचा पेच वाढला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ‘या’ जागांवर दावा सांगितला

मुंबई : राज्यात मार्च महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. कारण मे किंवा एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याआधीच आता राज्यात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरूवात झालीय. यातच महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा सामाना रंगण्याची शक्यता असून आता जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. यातच आता महायुती आघाडीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने लोकसभेच्या दोन जागा मागितल्या आहेत.

हेही वाचा…खासदार अमोल कोल्हेंची ‘क्रेझ’ ओसरली? शेतकरी आक्रोश मोर्चाला प्रतिसाद मिळेना! 

सोलापुरा आणि शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला द्या, अशी मागणी अक्कलकोट आरपीआयच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना द्यावी, अशी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आरपीआयच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.

हेही वाचा…सुनील केदारांचा पाय आणखी खोलात ; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, कोर्टात झालेल्या सुनावणीत काय झालं?

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे प्रमुख पक्षांसह इतर अनेक मित्र पक्षांचा समावेश महायुतीत आहे. यातच भाजप २४ जागा लढविण्यावर ठाम आहेत. तर उर्वरित जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने देखील जागा मागिल्याने जागा वाटपामध्ये आता कशा पद्धतीने गणित आखलं जातयं? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…आगामी निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्राचा वापर ; फडणवीसांनी नेत्यांना दिली ‘ही’ तंबी 

हेही वाचा“मुथरेत श्रीकृष्ण मंदिर उभारावं,” नितेश राणेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी 

हेही वाचा..“नववर्ष मावळतांना मावळची जागा आपली पाहिजे”, मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा नेता ठरला ? 

हेही वाचा..आदित्य ठाकरेंचा कोल्हापुर दौरा, ‘या’ दोन ठिकाणी ठाकरेंची तोफ धडाडणार 

हेही वाचा“महाराष्ट्रातला युवा आता थंड बसणार नाय,”आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवला, पवारांची सरकारवर जोरदार टिका