मुंबई : विरोधी पक्षांना कुमकुवत करण्यासाठी अनेक उद्योग केले जात आहेत. आपल्या फोनमध्ये कोणते फोटो आहेत, याची माहिती सरकारला हवी आहे, तशाप्रकारे अलर्ट देखील Apple फोनद्वारे येत असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले असून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टिका केलीय.
हेही वाचा…नाशिकमध्ये शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा, मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांचे राजीनामे सत्र सुरू
जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, Apple फोन हॅक होऊ शकत नाही असं नेहमी म्हटलं जायचं. परंतु Apple ने काही नेत्यांना ईमेलद्वारे कळवले आहे की, तुमचा Apple फोन हॅक केला गेला असून तसे त्यांनी State Sponsored असल्याचंही म्हटले आहे.
हेही वाचा…बीडमध्ये मराठा समाज आक्रमक, राष्ट्रवादीचं कार्यालय अन आमदारांचं घरही पेटवलं
आपण काय बोलतो? काय ऐकतो.? आपल्या फोनमध्ये कोणते फोटो आहेत, याची माहिती सरकारला हवी आहे. महुआ मोईत्राच्या बाबतीत जे घडतयं ते हॅकिंगमुळेच झालं असल्याचं स्पष्ट होत आहे. विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी अजून कोण-कोणते उद्योग केले जातील देव जाणे. जगामध्ये हॅंकिंग हा सर्वात मोठा गुन्हा धरला जातो. असंही आव्हाडांनी म्हटलंय.
Apple फोन हॅक होऊ शकत नाही असं नेहमी म्हटलं जायचं. पण, Apple ने काही नेत्यांना ईमेलद्वारे कळवले आहे की, तुमचा Apple फोन हॅक केला गेला आहे आणि तसे त्यांनी State Sponsored आहे असे देखिल म्हटले आहे. म्हणजे आपण काय बोलतो काय ऐकतो. आपल्या फोनमध्ये कोणते फोटो आहेत याची माहिती सरकारला… pic.twitter.com/EM6nUI3P8F
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची फोनवरून केली २० मिनिटे चर्चा, जरांगे पाटील म्हणाले..
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक दिवसीय अधिवेशन बोलावा,” राष्ट्रवादीची मागणी
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू अंतरवाली सराटीत दाखल, मनोज जरांगे पाटलांशी करणार चर्चा
हेही वाचा…वंचितचं पत्र अंतरवाली सराटी पोहचलं अन् जरांगे पाटलांनी घेतलं पाणी