मुंबई : केवळ सात दिवसांच्या शॉर्ट नोटीस व टेंडर काढून रूग्णवाहिका खरेदीत महायुती सरकारने ८००० कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. जे काम ४००० कोटीमध्ये होऊ शकत होते. त्या कामासाठी ८००० कोटीचा खर्च करण्यात आला आहे. असा दावा देखील वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच या घोटाळ्यात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात असून त्यावर कारवाई केली नाही तर मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला दिला आहे.
हेही वाचा…“१० वर्षापुर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्यांची चर्चा होत होती, मात्र आता…”मोदींचा काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल
केंद्र सरकारच्या योजनेतून राज्यभरात सुमारे १ हजार ७५६ रूग्णवाहिकांतून सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यातत १ हजार २२५ मोठ्या वाहनांसह अॅडव्हान्स लाईफ सर्पोटिंग रूग्णवाहिका, १६६ दुचाक्या, पाण्यातून जाणाऱ्या रूग्णवाहिकांचाही यात समावेश आहे. जुन्या ठेकेदाराला या योजनेसाठी महिन्याकाठी ३३ कोटी रूपये मोजले जात होते. तर नव्या टेंडरमध्ये नव्या ठेकेदाराला महिन्याकाठी ७४ कोटी २९ लाख रूपये देण्याची तयारी सरकारने दाखविली आहे. म्हणज नव्या ठेकेदाराला वर्षाला ९०० कोटी रूपये दिले जाणार आहेत. त्यानुसार दहा वर्षात सरकारच्या तिजोरीतून सुमारे ८ हजार कोटी ठेकेदाराला देण्यात येणार आहेत.
हेही वाचा…“शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात..” नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान
सरकारी रूग्णवाहिकेतून पैसे कमावण्याचा उद्योग सरकार बंद करण्याच्या मन:स्थितीत नाही. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, खास ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरूच आहे. या महाघोटाळ्यात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात असल्याचा संशय देखील बळावतो आहे. सरकारकडे पत्राद्वारे तक्रार करून देखील गेंड्याच्या कातडीचे सरकार कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे हा रूग्णवाहिका महाघोटाळा थांबवला नाही तर मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमानुसार टेंडरसाठी ठेकेदारांमध्ये स्पर्धा होऊन कामाचा दर्जा वाढविण्यासाठी टेंडर किमान २१ दिवसांचे हवे. त्यामुळे ठेकेदारांना सहभागी होता येऊ शकते. मात्र आयोगाचे नियम धुडकावून हे टेंडर ७ दिवसांचे काढण्यात आले. यानुसार ४ जानेवारीला काढलेल्या टेंडरची मुदत १६ जानेवारीला संपणार असून या दोन सरकारी सुट्टा आहेत. दुसरी बाब म्हणजे टेंडर परस्पर रद्द करून त्याच टेंडरच्या क्रमाकांवर नवे टेंडर काढली आहे.
सरकारी अॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा उद्योग सरकार बंद करण्याच्या मनःस्थितीत नाही. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, खास ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरुच आहे. या महाघोटाळ्यात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात असल्याचा संशय देखील बळावतो आहे.
सरकारकडे पत्राद्वारे तक्रार करून…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 2, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“आज शिवराय असते तर शेलारांसारख्या प्रवृत्तीला संपवण्यासाठी कडेलोट केला असता”, रोहित पवारांची जोरदार टिका
हेही वाचा“मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही!” उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार ? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…“आधी मटका अड्ड्यावर छापा, मग बोलवले पोलिसांना”, भाजपच्या माजी महिला आमदाराची एकच चर्चा
हेही वाचा…पुणे लोकसभा जिंकायचीय मग हे निकष पार पाडा, भाजपच्या इच्छूक उमेदवारांना दिले आदेश