मुंबई : निवडणुका जिंकण्यासाठी जो पैसा आणला जात आहे त्याचा इडीने तपास करायला हवा. आमदारांना विकत घेण्यासाठी प्रलोभंन दाखवणारे कोण आहेत? कोटींच्या आकड्यामागचे सुत्रधार कोण आहेत ? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणुक बिनविरोध होणार नसल्याचे आता निश्चित झाले आहे. त्याच पाश्वभूमीवर संजय राऊतांनी हे विधान केले आहे.
आमदार लक्ष्मण जगतापांची रूग्णालयातून घरात जोरात एन्ट्री, विरोधक मात्र कोमात
महाविकास आघाडीतील शिष्टमंडळातील मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार, शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित झाले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने एक उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपला अतिरिक्त एक उमेदवार देण्याची संधी महाविकास आघाडीकडून मिळणार आहे. अशा पद्धतीचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून भाजपला देण्यात आला आहे. मात्र तो प्रस्ताव भाजपने फेटाळून लावला.
राज्यसभेसाठी भाजपचे पारडे जड; भाजपच्या गळाला आणखी तीन आमदार..!
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ होत असताना राज्यातील राजकीय नेत्यांच्या भेटी होत आहेत. हे अत्यंत महत्वाचे आहे. सर्व पक्ष शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षनेत्यांना भेटत असेल आणि त्यातून चांगला मार्ग निघणार असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. असंही राऊत म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस हे परिपक्व नेते आहेत. असंही ते म्हणाले.
“साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल”; गृहमंत्री
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांना तर भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे दोन, तर आघाडीतील तिन्ही पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडणुन येणार मात्र सहाव्या जागेसाठी चुरस बघायला मिळणार आहे. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. तसेच या निवडणुकीसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. तसेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीची तडजोड होणार त्याकडे लक्ष आहे. तसेच या निवडणुकांमध्ये कोणता उमेदवार बाजी मारणार ते पण पाहाणं महत्वं ठरणार आहे.
Read also:
- राज्यसभेची 3 री जागा लढविण्यावर भाजप ठाम; धनंजय महाडिकच विजयी होणार?
- “फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली”; भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवार मागे घेणार का?
- राज्यसभेची जागा सोडा, विधान परिषदेची जागा घ्या ; महाविकास आघाडीकडून भाजपला ऑफर
- राज ठाकरेंच्या आदेशानंतर पत्रकं वाटायला गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्याला अटक
- अपक्ष डाव टाकणार की डाव साधणार?; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान