मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं. आता राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. परंतु अद्यापही विरोधी पक्षनेते पद जाहीर झालं नाही. यातच संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसकडे जाणार असून त्याची घोषणा लवकर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…राष्ट्रीय पातळीवर शरद पवारांना धक्का…! ‘या’ राज्यातील तब्बल ७ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा
राज्यात आता विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु काँग्रेस पक्षातच विरोधी पक्षनेतेपदावरून चुरस निर्माण झाली आहे. त्यात आता काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी थेट दिल्लीला पत्र पाठवल्याचे समोर आले आहे. या पत्रात ३० आमदारांचा मला पाठिंबा असल्याचा थोपटे यांनी दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरुवातीला काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांची नावे आघाडीवर होती. त्यानंतर गेल्या २ दिवसांपासून काँग्रेस दुसऱ्या फळीतील नेतृत्व पुढे आणण्याची शक्यता असल्याचे बोलले गेले. त्यात अनेक नावे चर्चेत आहेत.
हेही वाचा…विरोधी पक्षनेते पदाची उद्या घोषणा होणार, काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार विरोधी पक्षनेते पदाची माळ
दरम्यान, विधानसभेत संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसकडे जाणार आहे. यातच आज विधानसभेच्या नव्या विरोधी पक्षनेत्याची काॅंग्रेसकडून घोषणा होऊ शकते. तसेच उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांच्या निशाण्यावर आता प्रफुल्ल पटेल..! 28 जुलै ला राष्ट्रवादीचा मेळावा, कार्यकर्त्यांकडे लक्ष
हेही वाचा…“तुम्ही कोण, पात्रता काय, काय डोक्यावर पडल्यासारखे..”, अंबादास दानवेंनी भाजपच्या आमदाराची थेट इज्जतच काढली
हेही वाचा…ईडीकडून राऊतांच्या निकटवर्तींना पोलिस कोठडी..! सुजित पाटकर, सुरज चव्हाण नंतर नंबर कुणाचा ?
हेही वाचा…व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोमय्या दिल्लीत दाखल, अमित शहांची भेट घेणार ?
हेही वाचा…“दरडीचा अंदाज येत नसेल तर मग ते कसंल प्रशासन?” राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप