रायगड : रायगडमधील खालापूर तालुक्यातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे यामध्ये १५ ते २० मुलांचाही समावेश आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले असून आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या घटनेवर लक्ष्य ठेऊन आहेत. या घटनेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी …! संजय राऊतांना मोठा धक्का…! कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकरांना ईडीकडून अटक
रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळ्याची घटना अतिशय दु:खद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांनांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना शिवभोजन थाळीचं वाटप केलं जाणार, सरकारकडून मदत कार्य सुरू
पुढे बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळ शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असा खोचक सवाल देखील राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रीय पातळीवर शरद पवारांना धक्का…! ‘या’ राज्यातील तब्बल ७ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा
हेही वाचा…विरोधी पक्षनेते पदाची उद्या घोषणा होणार, काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार विरोधी पक्षनेते पदाची माळ
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटना ग्रस्त लोकांना केंद्राकडून मिळणार मदत, मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रूपयांची केली घोषणा
हेही वाचा…“संजय राऊतांच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढा, कधी देश सोडून..”, भाजपच्या आमदाराची मागणी
हेही वाचा…“इर्शालवाडी दुर्घटनेच्या अजित पवारांना तीव्र दु:ख, घेतला ‘हा’ मोठा निर्णय