नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना याचा मोठा फटका बसला. यातच राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि खासदार, आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. यातच आता राष्ट्रीय पातळीवर देखील अजित पवार यांना पाठिंबा मिळत आहेत.
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना शिवभोजन थाळीचं वाटप केलं जाणार, सरकारकडून मदत कार्य सुरू
नागालॅंड येथील राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रवादीचे राष्टीय प्रवक्ता ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे. तर नागालॅंडचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग ओडीने राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून गाव ढिगऱ्याखाली.., मंत्रिमंडळातील त्रिमूर्ती लागली कामाला
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीएमध्ये यावं, यासाठी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ३० आमदारांनी भेट घेतली. परंतु शरद पवारांनी यावर कोणतीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर बंगळुरू येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहिले. तर दुसऱ्या बाजूला मोदींच्या उपस्थित पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीसाठी अजित पवार हजर राहिले. त्यानंतर आता राष्ट्रीय पातळीवर अजित पवारांची एंट्री झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…विरोधी पक्षनेते पदाची उद्या घोषणा होणार, काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार विरोधी पक्षनेते पदाची माळ
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटना ग्रस्त लोकांना केंद्राकडून मिळणार मदत, मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रूपयांची केली घोषणा
हेही वाचा…“संजय राऊतांच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढा, कधी देश सोडून..”, भाजपच्या आमदाराची मागणी
हेही वाचा…“इर्शालवाडी दुर्घटनेच्या अजित पवारांना तीव्र दु:ख, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…मोठी बातमी …! संजय राऊतांना मोठा धक्का…! कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकरांना ईडीकडून अटक