दिल्ली : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी थेट संसद भवन गाठले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमय्या दिल्लीत गेल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. किरीट सोमय्यांची आक्षापार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने विरोधकांकडून जोरदार टिका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“इर्शालवाडी दुर्घटनेच्या अजित पवारांना तीव्र दु:ख, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांचे नेमके काम काय होते व ते कोणाला भेटायला आले होते ? याची माहिती देण्यास सोमय्या यांनी माध्यम प्रतिनिधींना नकार दिला. तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली का ? या प्रश्नावर, सोमय्यांनी नाही एवढचे सांगितले. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर मात्र सोमय्यांनी एकाही नेत्याच्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आणलेले नाही.
हेही वाचा…मोठी बातमी …! संजय राऊतांना मोठा धक्का…! कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकरांना ईडीकडून अटक
उलट ते स्वत: नको त्या कारणांसाठी वादात भोवऱ्यात अडकल्यानंतर ते पहिल्यांदाच दिल्लीला आले होते. यावेळी आक्षेपार्ह व्हिडीओबाबत विचारले असता सोमय्या अजिबात विचलित झाले नाहीत. चेहऱ्यावरील भावही न बदलता सोमय्यांनी या प्रकरमाची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चौकशी करत आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे प्रकरण नेण्याची गरज नाही असं सांगितले.
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना शिवभोजन थाळीचं वाटप केलं जाणार, सरकारकडून मदत कार्य सुरू
त्यांच्या चेहऱ्यावर त्रासलेले वा अपराधीपणाचे भाव नव्हते. त्यांनी प्रश्नांची उत्तरे देण्यासही टाळाटाळ केली नाही. अत्यंत निवांत भासणाऱ्या सोमय्यांनी स्पष्टपणे स्वत:ची मते मांडली. ‘मी कोणाचेही नुकसान केलेले नाही. राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीसांशी माझे बोलणे झाले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे’, असे सोमय्या यांचे म्हणणे होते.
READ ALSO :
हेही वाचा…“दरडीचा अंदाज येत नसेल तर मग ते कसंल प्रशासन?” राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप
हेही वाचा…राष्ट्रीय पातळीवर शरद पवारांना धक्का…! ‘या’ राज्यातील तब्बल ७ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा
हेही वाचा…विरोधी पक्षनेते पदाची उद्या घोषणा होणार, काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार विरोधी पक्षनेते पदाची माळ
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटना ग्रस्त लोकांना केंद्राकडून मिळणार मदत, मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रूपयांची केली घोषणा
हेही वाचा…“संजय राऊतांच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढा, कधी देश सोडून..”, भाजपच्या आमदाराची मागणी