मुंबई : मणिपुर दुर्घटनेचे पडसाद आता राज्यात देखील बघायला मिळत आहेत. आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तर संसदेत देखील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा तहकुब करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार अतुल भातखळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटना ग्रस्त लोकांना केंद्राकडून मिळणार मदत, मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रूपयांची केली घोषणा
मणिपुर घटनेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारवर ताशोरे ओढले आहेत. आम्ही मणिपुर सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच कठोर पाऊले उचलू. महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याचा व्हिडीओ पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. असं सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“संजय राऊतांच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढा, कधी देश सोडून..”, भाजपच्या आमदाराची मागणी
सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीवर अतुल भातखळकर म्हणाले की, सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा. कशाला हव्यात निवडणुकात आणि संसद ? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल असं भातखळकर यांनी म्हटले. त्यावर अहो भातखळकर तुम्ही कोण, तुमची पात्रता काय, आणि थेट सर्वोच्च न्यायालयावर बोलत आहात. असेच डोक्यावर पडल्यासारखे ट्विट करता, हास्यास्पद आहे. पण पोटातले ओठावर आले. तुमच्या कशाला हव्यात निवडणुका आणि संसद. हेच तर हवंय ना महाशक्तीला असं म्हणत अंबादास दानवे यांनी भातखळकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.
अहो, @BhatkhalkarA तुम्ही कोण, तुमची पात्रता काय, आणि थेट सर्वोच्च न्यायालयावर बोलत आहात. असेच डोक्यावर पडल्यासारख्ये #Tweet करता, हास्यासपद आहे.
पण पोटातले ओठावर आले तुमच्या ‘कशाला हव्यात निवडणुका आणि संसद’! हेच तर हवंय न महाशक्तीला! #Manipur https://t.co/SDPK7Y7wfY
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ईडीकडून राऊतांच्या निकटवर्तींना पोलिस कोठडी..! सुजित पाटकर, सुरज चव्हाण नंतर नंबर कुणाचा ?
हेही वाचा…व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोमय्या दिल्लीत दाखल, अमित शहांची भेट घेणार ?
हेही वाचा…“दरडीचा अंदाज येत नसेल तर मग ते कसंल प्रशासन?” राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप
हेही वाचा…राष्ट्रीय पातळीवर शरद पवारांना धक्का…! ‘या’ राज्यातील तब्बल ७ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा
हेही वाचा…विरोधी पक्षनेते पदाची उद्या घोषणा होणार, काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार विरोधी पक्षनेते पदाची माळ