पुणे – विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी धूळ चारली. तर नागपूरमध्ये छोटू भोयर यांच्या जागेवर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना चित करून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले. या विजयाचा आनंद भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पेढा भरवून साजरा करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाटील यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
राज्यात ज्याला आजपर्यंत दोन अंकी पाठबळ मिळालं नाही त्याला तुम्ही पंतप्रधान करणार – सताभाऊ खोत
आपण करू ते तत्वज्ञान आणि दुसरे करतील तो घोडेबाजार, अशी काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे. विदाऊट मोदी या देशाचा विकास होणार नाही, हे लोकांना समजले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने घ्या, मग तुम्हाला समजेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन जागांच्या निवडणुका झाल्या. मात्र, काँग्रेसने शब्द देऊनही तो पाळला नाही. त्यामुळे निवडणूक झाली. चंद्रशेखर बावनकुळे खूप मोठ्या फरकाने विजयी झाले. दोन्ही विजेत्यांचे अभिनंदन करतो. शिर्डीच्या साईबाबाचे वाक्य आहे. श्रद्धा आणि सबुरी. याचा आम्हाला फायदा झाला. काँग्रेसने या निवडणुकीत पोरखेळ केला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पवार साहेबांचं नेतृत्व फक्त आणि फक्त साडेतीन जिल्ह्यात; निलेश राणेंनी उडवली खिल्ली
चंद्रकांत पाटील म्हणाले, पटोले आणि केदार यांचा संघर्ष या निवडणुकीत दिसला. विधानसभा अध्यक्ष पदाची गुप्त मतदान पध्दतीने निवडणुकी घ्या, मग तुम्हाला समजेल. विदाऊट मोदी या देशाचा विकास होणार नाही, हे लोकांना समजले आहे. माझे तिकीट कापले म्हणून मी नाराज, असे आमच्या पक्षाने आम्हाला शिकवले नाही, सब्र का फल मिठा होता है, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. आपण करू ते तत्वज्ञान अन् दुसरे करतील तो घोडेबाजार, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Read Also :
- मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- शिवसेना सचिव नार्वेकरांचा अवैधरित्या बांधलेला बंगला जमीनदोस्त; किरीट सोमय्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
- ९६ मतं फुटली आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनोदवीर ठरले; आशिष शेलारांनी नाना पटोलेंची उडवली खिल्ली
- विजयाचा भावूक क्षण: देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताच बावनकुळेंना अश्रू अनावर, फडणवीसही गहिवरले
- महापालिका पोटनिवडणुक: खासदार सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यात होणार “कांटे की टक्कर”