पंढरपूर – सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापू लागला आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबीयांवर चांगलीच आगपाखड केली. पवार कुटुंबीयांना महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल. ओबीसी आरक्षणाचा खरा मारेकरी हा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी आज पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.
कोणी कितीही आकडे मोड करा, सहावी जागा शिवसेना लढेल; राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी शिवसेना ठाम
पडळकर म्हणाले, ओबींसाना आरक्षण देण्यासाठी त्यांची मानसिकता दिसून येत नाही, केवळ आपल्या जवळच्या प्रस्थापितांना राजकारणात त्याचा फायदा व्हावा; म्हणूनच त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. श्रीलंकेतील घराणेशाहीला कंटाळून तेथील लोकांनी उद्रेक केला. तसाच उद्रेक पवारांच्या विरोधात ओबीसी समाज करेल, त्यामुळे शरद पवारांनी वेळीच सावध व्हावे.
“महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होणार”, भुजबळांनी व्यक्त केला विश्वास
आमदार पडळकर म्हणाले की, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयीची संपूर्ण माहिती महाराष्ट्राला झाली आहे. पूर्वी लोक तुमच्या विरोधात बोलत नव्हते, त्याचा फायदा आजपर्यंत तुम्ही घेतला आहे. परंतु लोक आता तुमच्या विरोधात आवाज उठवू लागले आहेत. हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची लोकांची तयारी आहे. आपल्या जवळच्या लोकांना व नातेवाईकांना गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सत्तेत वाटा मिळावा, यासाठीच शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची धडपड सुरु आहे. म्हणूनच त्यांना ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचे नाही. ओबीसी आरक्षणाची खरी मारेकरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस फक्त वसुली करण्यात व्यस्त आहे. त्यांचे मंत्री परदेशात फिरायला गेले. त्यांची अवस्था ना घर का ना घट का अशी झाली आहे. जेलमध्ये जाण्यापेक्षा येथे राजगादी मिळाली आहे. झोपायला बंगले मिळाले आहेत. असे म्हणत काँग्रेसच्या मंत्र्यांवरही पडळकर यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर ओबीसी, मराठा यांच्या आरक्षणाबाबत काहीही देणे-घेणे नाही. केवळ त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, असा आरोपही त्यांनी केला.
Read also:
- राजकीय कट्टर विरोधकांचा लेह दौरा, रवी राणा – संजय राऊतांच्या जेवणायच्या पंगतीत रंगल्या गप्पा
- मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि नेते वसंत मोरेंवर गुन्हा दाखल
- संजय राऊत कोण आहेत? आमच्या लेखी फार महत्त्वाचा माणूस नाही – फडणवीस
- महाविकासआघाडीची नवी रणनीती; राज्यसभेसाठी देखील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसची महायुती
- “प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती