मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी गदारोळ उडवून दिला होता. राणा दाम्पत्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच पेटला होता. मात्र महाराष्ट्रातले हे कट्टर विरोधक लेह-लडाख दौऱ्यात चक्क एकत्र जेवण करताना दिसत आहे.
संभाजी राजेंचं आमदारांना खुल पत्र; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर”..;
संसदेतील परराष्ट्र व्यवहार समितीकडून लेहमध्ये अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त संजय राऊत आणि राणा दाम्पत्य सध्या एकाचवेळी लेह दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे काही फोटो समोर आले असून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राणा आणि संजय राऊत एकाच पंगतीत बसलेले दिसतात. तसेच दोघंही एकमेकांसोबत चर्चा करताना देखील दिसत आहेत.
काॅंग्रेसला पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठा धक्का! हार्दिक पटेलने दिला राजीनामा
राणा दाम्पत्य शिवसेनेवर वारंवार आरोप करतात. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी सांगितलं होतं. त्यासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दोघेही मुंबईला पोहोचले होते. पण, शिवसैनिकांनी त्यांना रोखण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दोघांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांनी तब्बल १३ दिवस कोठडीत काढले होते. कोठडीतून सुटका झाल्यानंतर राणा दाम्पत्याने शिवसेनेवर आरोप केले होते. आम्हाला कोठडीत वाईट वागणूक दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावेळी राऊतांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा नौटंकी करतात असे आरोप केले होते. तसेच दोघांचा उल्लेख ”बंटी-बबली” असा केला होता. नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार देखील केली होती.
“इतिहास नोंद ठेवेल, बाळासाहेबांच्या पोराने औंरग्याच्या कबरीला संरक्षण पुरवलं”
राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तक्रार करण्यासाठी थेट दिल्ली गाठली होती. त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना भेटून आम्हाला तुरुंगात वाईट वागणूक दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र संसदीय समितीच्या अभ्यास दौऱ्यासाठी राणा दाम्पत्य लेहकडे रवाना झाले. विशेष म्हणजे या दौऱ्यात खासदार संजय राऊत देखील आहे. या वादाचा परिणाम लेह दौऱ्यावर होणार का? असा प्रश्न होता. पण, संजय राऊत आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये चांगल्या गप्पागोष्टी रंगल्याचे दिसत आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मध्यप्रदेश सरकारलाही दिला हिरवा कंदील
दरम्यान, संसदीय समितीच्या संरक्षण समितीचे सदस्य सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. या समितीत 30 खासदारांचा समावेश असून यात महाराष्ट्रातील तीन खासदार आहेत. खासदार संजय राऊत, खासदार प्रकाश जावडेकर आणि खासदार नवनीत राणा यांचा समावेश आहे. खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत घेण्याची परवानगी आहे आणि त्यामुळे नवनीत राणा यांच्यासोबत आमदार रवी राणा हे लडाख दौऱ्यावर गेले आहेत.
Read also:
- मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि नेते वसंत मोरेंवर गुन्हा दाखल
- संजय राऊत कोण आहेत? आमच्या लेखी फार महत्त्वाचा माणूस नाही – फडणवीस
- महाविकासआघाडीची नवी रणनीती; राज्यसभेसाठी देखील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसची महायुती
- “प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती
- “एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत