मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळालं असून जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांच्या सगेसोयऱ्यांना प्रतिज्ञापत्राच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा समाजाला आता मोठा दिलासा मिळाला. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतूक केलं जात आहे. परंतु हा वाद आणखी वाढण्याची शक्यता असून भाजपच्या माजी खासदारानं याबाबत मोठं विधान केलंय.
हेही वाचा…” त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, लढा जिंकला, पण…
जरांगे पाटलांच्या मागणीनुसार राज्य सरकारने सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यावर आता भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी मोठं विधान केलंय. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचं मनापासून कौतुक करतो, मराठा आरक्षणासाठी दिलेला शब्द त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडायचा प्रयत्न केला. विषय सोपा नव्हता पण सन्माननीय शिंदे साहेबांच्या प्रयत्नाला सलाम. यानंतर काय होईल मला माहित नाही पण जितके प्रयत्न शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून केले त्याला तोड नाही. 34% मराठ्यांचा लढा मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार मार्गी लागेल आणि प्रमाणपत्रावर ‘मराठा’ अशी नोंद असेल ही अपेक्षा माझ्यासारखा कार्यकर्ता करतो. असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का : अजित पवारांचा प्रमुख शिलेदार खासदार अमोल कोल्हेंच्या ‘गळाला’?
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला आंदोलावर चांगला मार्ग निघून त्याची सांगता झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली होती. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न सुटलेला आहे. याचा मला आनंद आहे. जरांगे पाटील यांचं देखील आभार मानून अभिनंदन करतो. ,सुरूवातीपासून आपण सांगत आलोय की आपल्याला यातून कायद्याच्या माध्यमातून मार्ग काढावा लागेल. सरसकट करता येणार, मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत. त्यांना देता येईल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच संविधानाची तरतुद आहे. आमच्यावर कुठेतरीही अन्याय होईल का ? अशी ओबीसी बांधवांच्या मनात भीती होईल. त्यामुळे ओबीसींवर देखील कुठलाही अन्याय होऊ दिला नाही. अशी भूमिका देखील आम्ही घेतली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचं मनापासून कौतुक करतो, मराठा आरक्षणासाठी दिलेला शब्द त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडायचा प्रयत्न केला. विषय सोपा नव्हता पण सन्माननीय शिंदे साहेबांच्या प्रयत्नाला सलाम. यानंतर काय होईल मला माहित नाही पण जितके प्रयत्न शिंदे साहेबांनी…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 27, 2024
READ ALSO :
हेही वाचा…महाराष्ट्र हादरलं…! सागाच्या पानावर, स्वत:च्या रक्ताने पत्र, उपोषण मंडपातच शेतकऱ्याची आ’त्म’ह’त्या’
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ शपथ खरी करून दाखवली”, मराठा आरक्षणावर अजितदादांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, म्हणाले…अशा प्रवृत्ती
हेही वाचा…“मराठा आंदोलनाला मोठं यश..! सरकारने ‘सगेसोयरे’ “या” शब्दाची व्याख्या काय केलीय ?” वाचा सविस्तर
हेही वाचा…“छगनरावांनी आता तातडीने राजीनामा देऊन निषेध नोंदवावा,” शरद पवार गटाने भुजबळांना डिवचलं