मुंबई : काल राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टिका केली. यातच आजपासून अर्थसंकल्पावर राज्याच्या विधीमंडळात चर्चा केली जाणार आहे. त्याआधी विरोधी पक्षातील आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली.
हेही वाचा…“आपला दवाखाना अन् महिलांना बसमध्ये सुट, दिल्ली मॉडेलची काॅपी”, आपचा निशाणा
महाविकास आघाडीच्या आमदारांनी बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा असल्याच्या घोषणा देत डोक्यावर भोपळे घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. बजेटमध्ये मिळाला भोपळा. महाराष्ट्राला मिळाला भोपळा. बजेट म्हणजे रिकामा खोका. सर्वसामान्यांना मिळाला भोपळा. सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके. अशा घोषणांनी विधानभवनाचा परिसर विरोधकांनी दणाणून सोडला.
हेही वाचा…“गाजर हलवा तरी आम्ही दिला, त्यांनी तर काहीच दिलं नाही”, ठाकरेंची टिका, शिंदेंचा पलटवार
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केलीत.
Read also
- हेही वाचा…“माझ्या मुलाचं ‘र क्त’ वाहू देणार नाही “, संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी राज ठाकरे आक्रमक
- हेही वाचा…साई रिसोर्ट प्रकरणी सदानंद कदम ईडीने ताब्यात, अनिल परबांना झटका, विरोधकांची भाजपवर टिका
- हेही वाचा..उद्वय हिरेंकडे उद्धव ठाकरेंनी दिली ‘मोठी’ जबाबदारी, ठाकरेंची २६ मार्चला मालेगावात विराट सभा
- हेही वाचा..“भरीव तरतूद पण निव्वळ धूळफेक”, छगन भुजबळांंनी साधला सरकारवर निशाणा
- हेही वाचा..““शिंदे सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे सपनों का सौदागर..!”एकनाथ खडसेंची टिका