नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील राजकारणातला एक नवा चेहरा म्हणून उद्वय हिरे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी अलिकडेच भाजपमधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे मालेगावसह खानादेशात ठाकरे गटाला हिरा सापडला असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
हेही वाचा..“जनार्धन यांच्यासोबत नाही, म्हणून त्यांना अमृतांची आठवण यायला लागली”, मुंडेंनी फडणवीसांना डिवचलं
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्वय हिरे यांची शिवसेना उपनेते पदी म्हणून नियुक्ती केली आहे. अद्वय यांचे संघटन कौशल्य शिवसेना वाढीसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल. नव्या जबाबदारी बद्दल त्यांचे अभिनंदन..! असं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे आता मालेगाव बाह्या भागात मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात ठाकरे गटाची ताकद वाढलेली दिसून येते.
हेही वाचा..“३ रुपयात चहा तरी मिळतो का?” अजित पवारांनी गणित मांडत सरकारवर केला हल्लाबोल
यातच आता उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रात सभा होत आहेत. अलिकडेच खेड येथे झालेल्या सभेत लोकांची तुफान गर्दी बघायला मिळाली. यातच आता त्यांची येत्या २६ मार्चला म. स. गा महाविद्यालयाच्या प्रांगणावर ठाकरेंची विराट महासभा होणार आहे. या सभेसाठी सेना नेते प्रमुख नेत्यांसह ठाकरे गटाचे महाराष्ट्रातील सर्व मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. यात माजी मंत्री सुभाष देसाई, विरोधी प क्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्करराव जाधव, संपर्कप्रमुख जंयत दिंडे, सहनेते सुनील बागूल, सुधाकर बडगुजर, सुरेश पवार, पवन ठाकरे आदी उपस्थित होते.
Read also
- हेही वाचा..“भरीव तरतूद पण निव्वळ धूळफेक”, छगन भुजबळांंनी साधला सरकारवर निशाणा
- हेही वाचा..““शिंदे सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे सपनों का सौदागर..!”एकनाथ खडसेंची टिका
- हेही वाचा…“आपला दवाखाना अन् महिलांना बसमध्ये सुट, दिल्ली मॉडेलची काॅपी”, आपचा निशाणा
- हेही वाचा…“गाजर हलवा तरी आम्ही दिला, त्यांनी तर काहीच दिलं नाही”, ठाकरेंची टिका, शिंदेंचा पलटवार
- हेही वाचा..सर्वसमावेशक अर्थसंकल्प..! उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३ हजार ६१३ कोटी ३५ लाखांची भरीव तरतुद, चंद्रकांत पाटील