मुंबई : सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया असलेला आणि राज्याला अधिक समृद्ध करणारा राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सादर केला. हा सामान्य जनतेसाठीचा ‘महाअर्थसंकल्प’ आणि ‘जनसंकल्प’ असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
हेही वाचा..राज्यात विविध महामंडळांची घोषणा, प्रत्येक महामंडळासाठी 50 कोटींची तरतुद
पाटील म्हणाले, या अर्थसंकल्पात बार्टी, सारथी, महाज्योती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) विभागीय कार्यालय नाशिक येथे उभारण्यात येणार आहे.
हेही वाचा..अर्थसंकल्प..! मुंबईच्या धर्तीवर राज्यात ७०० हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बांधण्याचा निर्णय
विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ,नागपूर; शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था,अमरावती; कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे; गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर; डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई; लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थांना अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन विशेष अनुदान देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर पुण्यातील भिडे वाडा स्मारकासाठी ५० कोटींची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
हेही वाचा…अर्थसंकल्प 2023-24..! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, फडणवीसांकडून पाच ‘अमृत’ ध्येंयावर भर
उच्च शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याकरिता उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३ हजार ६१३ कोटी ३५ लाख ११ हजार रूपयांची भरीव तरतुद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन राज्याला समृद्ध करणारा विकासाचा महाअर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी दिली आहे.
Read also
- हेही वाचा..“जनार्धन यांच्यासोबत नाही, म्हणून त्यांना अमृतांची आठवण यायला लागली”, मुंडेंनी फडणवीसांना डिवचलं
- हेही वाचा..“३ रुपयात चहा तरी मिळतो का?” अजित पवारांनी गणित मांडत सरकारवर केला हल्लाबोल
- हेही वाचा…“सरकार पडणार हे फडणवीसांना माहिती, त्यामुळे बजेटमध्ये घोषणांचा पाऊस,” आदित्य ठाकरे
- हेही वाचा…“स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे, अन् घोषणांचा सुकाळ असा आताचा अर्थसंकल्प” अजित पवारांची प्रतिक्रिया
- अर्थसंकल्प..! महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय