मुंबई : गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून अनेक घोषणा शिंदे सरकारकडून करण्यात आल्या. त्यातील एकाही घोषणांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. ज्या सरकारमध्ये गद्दार बसले आहेत. ज्यांनी अन्नांची शपथ घेऊन पाठीत खंजीर खुपसलं. अशा सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. त्यामुळे यांच्या तोंडूनं संत, धर्माबद्दल बोलणं शोभत नाही. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. आज विधीमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला.
हेही वाचा…शिंदेंच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ठेवले मध्यभागी, सरकारकडून मोठ्या योजनांची घोषणा
ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, उद्योग पळवून लावले. महापुरूषांबाबत बेताल वक्तव्य केलीत. अशी लोक महापुरूषांची नावं घेतात, म्हणजे हसवाहसवी बजेठ असं झालं आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात सरकार पडणार आहे. अन् निवडणुका लागू शकतात. त्यामुळे त्यांनी एवढ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्या लोकांना विस्ताराच्या आशा दिसत नाही. अशा लोकांसाठी कुठे ना कुठे बसवणं गरजेचं असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
हेही वाचा..शिंदे सरकारचा मास्टरट्रोक…! शेतकऱ्यांसाठी नवी “नमो” योजना
आज राज्याच्या अर्थमंत्र्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दुरदृष्टीचा अभाव, वास्तवाचं भान नसेलेला असा अर्थसंकल्प आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. आमचं सरकार असतांना देखील आम्ही अर्थसंकल्प सादर केलेत. परंतु स्वप्नांचे इमले, अन् शब्दांचे फुलोरे, घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला. आज राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
Read also
- हेही वाचा…“स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे, अन् घोषणांचा सुकाळ असा आताचा अर्थसंकल्प” अजित पवारांची प्रतिक्रिया
- अर्थसंकल्प..! महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय
- हेही वाचा..राज्यात विविध महामंडळांची घोषणा, प्रत्येक महामंडळासाठी 50 कोटींची तरतुद
- हेही वाचा..अर्थसंकल्प..! मुंबईच्या धर्तीवर राज्यात ७०० हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बांधण्याचा निर्णय
- हेही वाचा…अर्थसंकल्प 2023-24..! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, फडणवीसांकडून पाच ‘अमृत’ ध्येंयावर भर