मुंबई : असंघटित क्षेत्रातील तीन कोटीहून अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला.
हेही वाचा..“आर्थिक पाहणी अहवालावर रोहित पवारांची सरकार खोचक प्रतिक्रिया”, म्हणाले की,
२०२३-२४ या आर्थिक वर्षात इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांची तीन हजार कोटी रुपये किमतीची चार हजार पाचशे किलोमीटरच्या लांबीचे रस्ते सुधारण्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन रोजगार निर्मितीस चालना देण्याकरता आमच्या शासनाने सन २०१८ मध्ये संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र माती कला मंडळाची स्थापना केली होती याकरिता २५ कोटी रुपये प्रस्तावित आहे.
हेही वाचा..पन्नास खोके अन् नागालॅंड ओक्के, विधानसभेत नागालॅंडचा मुद्दा, सत्ताधारी विरोधक आमनेसामने
आमच्या शासनाने डिसेंबर २०२२ मध्ये स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण केला. या विभागाकडून दिव्यांगांचे शिक्षण, पुनर्वसन, रोजगार स्वयंरोजगार यासंबंधी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल. आदिवासी विभागाच्या माध्यमातून २५० शासकीय आदिवासी आश्रम शाळांना आदर्श आश्रम शाळा म्हणून घोषित करण्यात येईल. अल्पसंख्यांक महिलांच्या आर्थिक विकासासाठी १५ जिल्ह्यांमध्ये सुमारे ३००० बचत गटाची निर्मिती करण्यात येईल.
हेही वाचा…“राज साहेब अतिशय दिलदार मनाचा राजा माणूस”, जुने ऋणानुबंध जुळले, धंगेकरांची प्रतिक्रिया
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), लिंगायत समाजातील तरुण सुशिक्षित बेरोजगार व नवोद्योजकांना स्वयं उद्योग अर्थसहाय्य देण्यासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ यांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळअंतर्गत स्थापना करण्यात येईल. ही महामंडळे विविध कल्याणकारी योजना राबवतील त्यासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपये अधिकृत भाग भांडवल देण्यात येईल.
Read also
- हेही वाचा..राज्यात विविध महामंडळांची घोषणा, प्रत्येक महामंडळासाठी 50 कोटींची तरतुद
- हेही वाचा..अर्थसंकल्प..! मुंबईच्या धर्तीवर राज्यात ७०० हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बांधण्याचा निर्णय
- हेही वाचा…अर्थसंकल्प 2023-24..! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, फडणवीसांकडून पाच ‘अमृत’ ध्येंयावर भर
- हेही वाचा…शिंदेंच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ठेवले मध्यभागी, सरकारकडून मोठ्या योजनांची घोषणा
- हेही वाचा..शिंदे सरकारचा मास्टरट्रोक…! शेतकऱ्यांसाठी नवी “नमो” योजना