रत्नागिरी : सोलगाव-बारसू येथील रिफायनरीविरूद्ध गेल्या काही दिवसापासून स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. त्यांच्याशी भेट घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाड येथे जाहीर सभा होत आहे. त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरे यांची तोफ नेमकी कुणावर धडाडणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
हेही वाचा…“सरकार पडल्यानंतर त्यांचं काय करायचं ते आम्ही करू”, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार घणाघात
महाविकास आघाडीत संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ती भक्कम राहण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. यातच उद्धव ठाकरे यांच्या सभेला लोकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळा असल्यामुळे अलिकडे जास्त सभा होत नाही. परंतु यापुढे आता सभा होत राहणार. असं म्हणत कुणी काही ट्विट करतील त्यावर माझा विश्वास ठेवायचा नाही. असं उत्तर त्यांनी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीवर दिलं.
हेही वाचा…“शिंदेंना बाजूला ढकलून फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर, त्याची चिंता शिंदेंसह चाळीसवीरांनीही करावी”
दरम्यान, आज कोकणात सभांचा पाऊस पडणार आहे. उद्धव ठाकरे यांची सायंकाळी ६ वाजता सभा होत आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील सभा होत आहे. कोकणात मागील काही दिवसांपासून बारसू प्रकल्प रिफायनरीविरूद्ध स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावर दोन्ही नेते काय बोलणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“१६ आमदार अपात्र ठरले तरी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, कारण..” शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“ज्यांच्या गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली, त्यांना ३ जिल्हातील लोकही ओळखत नाही”
हेही वाचा…“साथ द्यायचं सोडून चंद्रकांत पाटील अन् शंभुराज देसाई कोणत्या बिळात लपून बसले ?”
हेही वाचा…“महाराष्ट्राचा भगवा दिल्लीवर फडकवण्यासाठी आबा मी आज उद्धवसाहेबांसोबत”, स्नेहल जगतापांचा ठाकरे गटात प्रवेश
हेही वाचा…“अजित पवार भाजपसोबत येणार नाहीत, राष्ट्रवादीची नौटंकी चाललीय”