चंद्रपुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना फुटीनंतर अनेकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. अनेक आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, पदाधिकारी ठाकरे यांची साथ सोडत असतांना, आंबेडकरी चळवळतील आणि पहिल्यांदा राष्ट्रवादीत असलेल्या निर्भीड वक्त्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. अन् आपल्या प्रखर, आणि कडक शैलीच्या जोरवार त्यांनी वेगवेगळ्या भाषणांमधून बंडखोरांवर टिका करण्यास सुरूवात केली. त्यामुळे त्या अल्पकालावधीत संपुर्ण महाराष्ट्रात परिचित झाल्या. त्यांनी अनेक सभा गाजवल्या. अशातच माझ्यावर चौकशी लावण्यासारखं काहीही नसल्याने माझा घात अपघात होऊ शकतो, अशी भीती त्यांनी चंद्रपुर येथील सभेत बोलतांना व्यक्त केली आहे.
“राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी 1 हजार कोटी खर्च”, प्रियंका गांधी
काही अधिकारी मला नेहमी सांगतात की, ताई रात्रीचा प्रवास टाळा. तुमच्यावर चौकशी लावण्यासारखं काहीही नसल्याने तुमचा घात अपघात होऊ शकतो. अपघातात अनेक जण गेलेत. ताई तुमच्यावर काहीच नाही तुमच्यावर लावण्यासारखं. त्यामुळे तुमचा थेट शुट करण्याऐवजी तुमचा अपघात घडू आणू शकतात. अशी भीतीही सुषमा अंधारे यांनी चंद्रपुर येथील एका सभेत व्यक्त केली आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध, फडणवीसांना टॅग
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझी प्रतित्माक तिरडी बांधली काय, आणि त्यांनी प्रत्यक्ष तिरडी बांधण्याची तयारी ठेवली काय? मी मात्र माझं काम करायचं ठरवून घेतलं आहे. त्यामुळे त्यांनी कितीही काहीही केलं तरी मी माझं प्रामाणिक काम करत राहणार, असं ठणकावून देखील सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे.
“कधीच कुणावर वैयक्तीक कंबरेखाली वार करत केला नाही, जर मला..” जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
दरम्यान, मध्यंतरी सुषमा अंधारे यांच्या जुन्या वक्तव्याच्या व्हिडीओ क्लिप समाज माध्यमांवर फिरत होत्या. वारकरी, साधू संत आणि देव देवांताबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्या विरोधकांच्या निशाण्यावर आल्या होत्या.काही ठिकाणी त्यांची प्रतित्माक तिरडी देखील बांधून निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी याबद्दल लगेचच माफी मागून दिलगिरी व्यक्त केली होती. विरोधकांचा त्यांना फसवण्याचा डाव होता. परंतु त्या यामधून सहज सुटल्या. त्यानंतर त्यांचा तो भाषणांमधील करारीपणा तसाच पुढे राहिला.
Read also
- आम्हाला सुप्रिया सुळे नको, अजित पवारच द्या, अन् कार्यकर्त्यांनी केली शरद पवारांकडे मागणी
- “बुलडोझर बाबा तुमच्या राज्यातील कायदा अन् सुव्यवस्था सुधारा”
- “40 गद्दार आमदार, अन् 13 खासदार गद्दारांनी या वर्षात तरी निवडणुक घेऊन दाखवावी”; आदित्य ठाकरेंचा इशारा
- नितेश राणेंवर रूपाली पाटील भडकल्या, म्हणाल्या, “टिल्या बेडकांनी धरणात..”
- योगींच्या जाहिराती महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना देण्यामागचा भाजपचा छुपा अजेंडा काय?