नाशिक : आगामी महापालिका डोळ्यासमोर ठेऊन अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक येथील जवळपास 50 पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहे. विशेष: ता शिवसेनेचे खासदार संजय राऊत दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. परंतु त्यांना हे पक्षप्रवेश रोखता आलं नाही. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला मानला जात आहे.
योगींच्या जाहिराती महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना देण्यामागचा भाजपचा छुपा अजेंडा काय?
आज नाशिक येथील अनेक वाघ शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यांना कुणी मेंढरं म्हणू दे, किंवा काहीही म्हणू दे. परंतु हे शिवसेनेचे वाघ आहेत. अन् ते परत आपल्या मुळ शिवसेनेत येत आहेत. त्यांचा आम्हाला आनंद आहे. असं म्हणत शिदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी संजय राऊतांवर टिका करतांना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी 1 हजार कोटी खर्च”, प्रियंका गांधी
नाशिकमधील शिवसेना जशीच्या तशी आहे. ज्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांची मला काय पण नाशिकच्याच लोकांना नावं माहिती नाहीत. येडे गबाळ्या लोकं पकडतात अन् पक्ष प्रवेश झाला म्हणून दाखवतात. दोन तीन दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील. परंतु जागेवरची शिवसेना येथेच आहेत. मेंढरं पकाडायची अन् खाटीक म्हणून घेऊन जायची, अशी टिका संजय राऊतांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध, फडणवीसांना टॅग
दरम्यान, मागील काही दिवसापासून ठाकरे आणि शिंदे गटात पक्षप्रवेश करण्यांची संख्या वाढत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दोन्ही बाजूचे पक्ष कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षात घेतांना दिसत आहेत. यातच ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय लढाई न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे याचा निकाल काय लागतो, त्याची देखील धासधुस काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी तटस्थेची भूमिका घेताना दिसत आहेत.
Read also
- “ते माझा घात अपघात घडवून आणू शकतात”, सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
- आम्हाला सुप्रिया सुळे नको, अजित पवारच द्या, अन् कार्यकर्त्यांनी केली शरद पवारांकडे मागणी
- “बुलडोझर बाबा तुमच्या राज्यातील कायदा अन् सुव्यवस्था सुधारा”
- “40 गद्दार आमदार, अन् 13 खासदार गद्दारांनी या वर्षात तरी निवडणुक घेऊन दाखवावी”; आदित्य ठाकरेंचा इशारा
- नितेश राणेंवर रूपाली पाटील भडकल्या, म्हणाल्या, “टिल्या बेडकांनी धरणात..”