मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना एकजुठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. यातच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानांचा चेहरा उद्धव ठाकरे असतील, तर त्यात काही शंका नाही. असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..“४० आमदार आणि १३ खासदार सांभाळता आले नाही, ते देश काय सांभाळणार”?
स्वप्नात रंगणारा, दंगणार मी नाही. याबाबत अनेकदा सांगितलं आहे की, जी जबाबदारी माझ्यावर येते, ती प्रमाणिकपणाणे पार पाडतो. यातच मुख्यमंत्री पदाचीही जबाबदारी माझ्यावर आली होती. त्याबद्दल मी सगळंच सांगितलं आहे. परंतु माझ्या मनात अशी कोणतंही स्वप्ने नसतात. मात्र एक मात्र नक्की देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आता सर्वसामान्य माणसांनी खांद्यावर घेणं गरजेचं आहे. असंही ते म्हणाले.
हेही वाचा..” देशात लोकांची हुकूमशाही आहे, कुणा पंतप्रधानांची हुकूमशाही नाही”,प्रणीती शिंदेंचा मोदींवर हल्लाबोल
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशीही उपस्थिती होते. यावेळी धंगेकराच्या विजयानंतर ठाकरेंनी जॉर्ज फर्नाडिसच्या विजयाची आठवण करून दिली. तसेच महाविकास आघाडीमध्ये असंच आपण काम करत राहिलो तर आपण प्रत्येक निवडणुका जिंकू शकतो. असा विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला.
Read also
- हेही वाचा..““काल सरकार धुळवडमध्ये रंग उडवण्यामध्ये दंग, अन शेतकरी बेरंग होता”
- हेही वाचा..“विजयी गुलाल उधळल्यानंतर भेटीगाठी वाढल्या,” धंगेकरांनी खरगेंची घेतली भेट
- हेही वाचा…“स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक”, राज ठाकरे
- हेही वाचा…“मंत्री तुपाशी, शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा,” विरोधकांच्या राज्य सरकारच्या विरोधात घोषणा
- हेही वाचा..भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार ? राजकीय चर्चांना उधान