अकोला : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वारे बदलू लागले आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर आता उद्धव ठाकरे यांना लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी माजी आमदार खासदार ठाकरे गटात प्रवेश करतांना दिसत आहेत. यामुळे आता ठाकरेंची ताकद वाढत असल्याचं सध्या चित्र राजकीय वर्तुळात दिसत आहे.
हेही वाचा…नाशिकमध्ये ‘या’ गावात शेतकऱ्यांनी कांदे फेकले रस्त्यावर, निवडणुकांवर टाकला बहिष्कार
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि अकोला पुर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे आता राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत आज मंगळवारी मातोश्रीवर झआलेल्या बैठकीत हरिदास भदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली आहे. येत्या २ सप्टेंबरला बैठक होणार असून त्यानंतर पक्ष प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
हेही वाचा…कांद्यावरून राजकारण तापलं, मुख्यमंत्र्यांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, कृषी मंत्री असतांना..,
हरिदास भदे हे वंचित म्हणजेच पुर्वीच्या भारिप बहुजन महासंघाच्या तिकीटावर २००४ ते २०१४ या कालावधीत अकोला पुर्वेचे आमदार होते. त्यांचा सुरूवातीला भारिप, काॅंग्रेस पुन्हा वंचित त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस असा राजकीय प्रवास राहिला आहे. तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज ठाकरे गटात ठाकरेंच्या उपस्थित प्रवेश होणार आहे.
हेही वाचा…“केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसोबत मोठा डाव, कांद्यावरून सरकारने शेतकऱ्यांना फसवलं ?” वाचा सविस्तर
भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवार असणार अशी चर्चा सुरु आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत सध्या ते भाजपमध्ये होते, त्यांनी 2019 ला तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी अन् ठाकरे गटाला एकाच वेळी धक्का, एकनाथ शिंदेंची मोठी खेळी
हेही वाचा…“शिंदेसोबत गुवाहाटीला गेल्याने आम्ही बदनाम झालो”, बच्चू कडूंनी व्यक्त केली भावना
हेही वाचा…“सिलेंडर ५०० रूपये., महिलांना महिन्याला १५०० रूपये, १०० युनीट वीज युनीट माफ,” काॅंग्रेसने ‘या’ राज्यात केल्या मोठ्या घोषणा
हेही वाचा…अजित पवारांमुळे शिंदेंच्याआमदारांची गोची अन् रामदास आठवले सांगताहेत, “आम्हालाही मंत्रिपद हवंय”