मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे आज संपुर्ण राज्यात धुलिवंदन साजरा केला जात आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी दु:खात तर नेते मात्र आनंदात धुलिवंदन साजरा करतांना दिसत आहेत.
हेही वाचा..“मी घटनाबाह्य वागणाऱ्या संस्थेला शिवी दिली हा उद्रेक”, संजय राऊतांचं स्पष्टीकरण
ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्हांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापुर परिसरात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने कांदा, द्राक्षे, कापुस पिकांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर सरकारविरोधात आम्ही आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
हेही वाचा..“भाजपला चोपायची ‘ही’ संधी मला सोडायची नाही, शरद पवारांची भेट घेऊन..” अमोल मिटकरींनी भाजपला दिला इशारा
अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आज राज्यात एकीकडे गहू, ज्वारी, कांदा, केळी तसेच रब्बी पिकाचे अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राजकीय धुळवड जोरात सुरू आहे. शेतकऱ्याला याच अधिवेशनात झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारने न दिल्यास आंदोलनाची दिशा तीव्र होईल. असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा..“नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला..! ठाकरेंच्या नव्या शिवसेनेचा प्लॅन ठरला..
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
आज राज्यात एकीकडे गहु, ज्वारी, कांदा, केळी तसेच रब्बी पिकाचे अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे तर दुसरीकडे राजकीय धुळवड जोरात सुरू आहे. शेतकऱ्याला याच अधिवेशनात झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई सरकारने न दिल्यास आंदोलनाची दिशा तीव्र होईल.@EknathShindeEng @Dev_Fadnavis
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 7, 2023
Read also
- हेही वाचा..“अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकर ९ तारखेला घेणार आमदारकीची शपथ”
- हेही वाचा..“सरकारने शेतकऱ्याला नुकसानाची भरपाई दिली नाही तर..” अमोल मिटकरींचा कडक इशारा
- हेही वाचा..“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोपडलं, उद्या सभागृहात.. ” अजित पवारांनी राज्य सरकारला दिला इशारा
- हेही वाचा…“३० लाख रूपये द्या, अन्यथा रूपेश मोरेला…, वसंत मोरेंच्या मुलाला धमकी, पुण्यात खळबळ”
- हेही वाचा…“तो हल्ला राजकीय नाही तर..” आमदार डॉ. प्रज्ञा सातव हल्ल्याप्रकरणातील आली मोठी माहिती