दापोली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जवळचे सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या, दापोलीतील बंगला जमीनदोस्त करण्यात आला असून, विना परवानगी या बंगल्याचं बांधकाम सुरु असल्याची तक्रार भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यानंतर आता (रविवारी) हा बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांनी याबाबतीत ट्विट देखील केलं आहे.
करून दाखविले !!!!
मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला.
मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले
पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा
उद्या मी दापोली ला जावून तोडकामाची पाहणी करणार pic.twitter.com/azpHTiFHlQ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 22, 2021
दरम्यान, नार्वेकरांनी मुरुड इथल्या दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर एक अलिशान बंगला बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांनी, सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून हा बंगला बांधला असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे, या बंगल्यावर आज सकाळपासून कारवाई सुरु होती. जेसीबीने हा बंगला तोडण्यात आला. नार्वेकरांच्या बंगल्यावरील कारवाई, मुख्यमंत्र्यांसाठी मोठा दणका असल्याचं समजलं जात आहे.
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र! बाळासाहेब थोरातांचे मोठे विधान
काही महिन्यांपूर्वी या बंगल्याला घेऊन सोमय्या यांनी, नार्वेकरांवर आरोप केले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांचा या सगळ्यात हात आहे. नार्वेकरांनी दापोलीतील मुरुड इथे, समुद्र किनाऱ्यावर ७२ गुंठे जागा घेतली असून, या जागेवर विनापरवानगी व गैरकायदेशीररित्या दुमजली बंगल्याचे काम सुरु आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगल-झाडांची कत्तल सुरु असून, उत्खननही चाललं आहे,” असे ते म्हणाले होते.
शिवसेनेत घुसमट? नारायण राणेंच्या गौप्यस्फोटवर, एकनाथ शिंदे म्हणतात…
यावेळी त्यांनी, परविहान मंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप केला होता. “एका बाजूला करोनामुळे नागरिक मृत्युमुखी पडत असताना, शिवसेनेचे लॉकडाऊनचा फायदा घेऊन, भव्य रिसॉर्ट आणि आलिशान बंगले बांधत आहेत आणि सरकारही या दोघांना पाठीशी घालत आहे,” असं म्हणत राजकीय वातावरण ढवळून काढले होते. तसेच, आजच्या कारवाईननंतरही त्यांनी अनिल परब यांना इशारा दिला असून, “पुढचा नंबर मंत्री अनिल परब,” असे ट्विट त्यांनी केले आहे.
Read Also :
- आमदार निलेश लंकेंवर केलेल्या गंभीर आरोपावर सुप्रिया सुळे म्हणातात…
- “उपमुख्यमंत्री अजित पवार हवी तशी साथ देत नाहीत,” यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
- परमबीर सिंग-वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९ लाख वसूल केले, बारमालकाचे गंभीर आरोप
- “एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, त्यांना आमच्यात घेऊ”; राणेंचा मोठा गौप्यस्फोट
- राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला, भाजपकडून पहिल्यांदाच दिली गेली प्रतिक्रिया