नागपूर : मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वडेट्टीवारांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे. त्यावर, “बाबा रे, तुला जे बोलायचं असेल तर पुराव्यानिशी बोल. उगाच बेछूटपणे आरोप करू नकोस,” असं सांगत, “पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर, त्यांनी आरोप सिद्ध करावे,” असं थेट आव्हानच त्यांनी दिलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
“मलाही तुमच्यातला दम पाहायचंय,” चित्रा वाघ यांनी स्वीकारलं मेहबूब शेख यांचं आव्हान
“पडळकर आता कार्यकर्ते राहिले नसून, आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री आहे, असा त्यांचा आरोप आहे, तर त्यांनीच सांगावं कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे? पत्ता सांगावा, कोणत्या नातेवाईकाची आहे हे देखील सांगावं. नाही तर मी त्यांच्यावर थेट अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. माझी कोणत्या फॅक्ट्रीत भागीदारी आहे, ती त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावी, नाहीतर मी कोर्टात जाईन,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
“…अन्यथा संजय राऊतांना पुण्यात फिरुही देणार नाही,” भाजपचा आक्रमक पवित्रा
तसेच, “माझ्यावर त्यांनी केलेले आरोप सिद्ध करावे, ते पुरावे द्यावे, आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन. छत्तीसगड मध्ये माझ्या नावाने किंवा माझ्या नातेवाईकांच्या नावाने कुठलेही दारुचे दुकान नाही की कंपनी नाही. पडळकरांनी ऐकीव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. मी कष्टातून, संघर्षातून इथवर आलो आहे. ओबीसी चळवळीला बदनाम करण्याचं काम पडळकर करत आहेत,” असा आरोप त्यांनी पडळकरांवर केला आहे.
Read Also :
- गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला पुण्यातील मेट्रो पूलाचा अडथळा; तात्काळ बैठक बोलवून तोडगा काढा – काँग्रेस
- ब्रेकिंग! करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- बेळगाव महापालिकेत भाजपचा दणदणीत विजय; राज्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसणार?
- करुणा शर्मा यांना अडकवण्यासाठी रचले गेले षडयंत्र? नवी माहिती समोर
- चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यात रंगले सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध