मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन भाजपने मोठी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा देत भाजपने रणशिंग फुंकले आहेत. यातच भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगितल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यातच आता भाजपचे नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“मोदींनी कोवीडची लस शोधून काढली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का?”, ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एवढी का मिरची झोंबते? मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता? किती स्टंप आणि बॅट तुमच्याकडे आहेत ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवेत. त्यांनी चौकशी लावून तुमचे कटकमिशनचे उद्योग मुंबईकरांसमोर उघडे पाडायचे ठरवले. असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“आजच्या काळातील जगातील सर्वांत मोठा नेता म्हणजे राहुल गांधी”
पुढे बोलतांना त्यांनी असं म्हटलं आहे की, तेव्हा तर दीड कोटी मुंबईकरसुद्धा तुम्हाला हिशोब विचारणार आहेत, तेवढे स्टॅंप आणि बॅट आहेत का तुमच्याकडे? आम्ही तर रोज विचारणार आहे. कोविडमध्ये कफना तर पण कट कमिशन कोणी खाल्ले? औषधांवरची मलाई कुणी खाल्ली? रस्त्यावरचे डांबर, नाल्यातील गाळ, शाळेतील मुलांच्या वस्तू यामध्ये कोट्यवधी कुणी लाटले? या स्टॅंप घेऊन आम्ही पण तयार आहोत. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते?
मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता?
किती स्टंप आणि बॅट तुमच्याकडे आहेत?मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवेत, त्यांनी चौकशी…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो ते,.. ” फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पलटवार
हेही वाचा…शिंदे गटात गेलेल्या आमदार ‘मनिषा कायंदें’वर अपात्रतेची टांगती तलवार, अपात्रतेची कारवाई होणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ तर ठाकरेंकडून ‘खोके दिवस’ साजरा, शिंदे ‘असं’ देणार प्रत्युत्तर
हेही वाचा…“तुझ्या पोराला दुसऱ्यांदा खासदार होऊ द्यायचं की नाही ते आम्ही ठरवणार”, निलेश लंकेंनी भाजपच्या मंत्र्यांला डिवचलं
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्रिमंडळातील ‘५’ मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही”